mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कौतुकास्पद! मंगळवेढ्यातील ‘त्या’ कुटुंबाला तहसीलदार रावडे यांनी एकाच दिवसात सर्व शासकीय सुविधांचा लाभ दिला मिळवून

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 20, 2022
in आरोग्य, मंगळवेढा, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स।

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील जाधव कुटुंबाची बातमी प्रसिध्द होताच तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी त्या कुटुंबाला एकाच दिवशी सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कुटुंबाच्या चरितार्थासाठी सालगडी म्हणून राबणारा कुटुंबकर्ता अर्धांगवायूमुळे जर्जर होवून सहा वर्षापासून अंथरुणाला खिळलेला, एक मुलगा तोही रोजंदारीवर कामाला, धाकटा मुलगा मतिमंद,

वैद्यकीय खर्च आणि मोठ्या खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी राबणाऱ्या हाताला झालेले फॕक्चर यामुळे कुटुंबावर उपासमारीचे संकट आ वासून उभे आहे.

ही वास्तवदर्शी कहाणी आहे, मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावाचे शेतमजूर हरीभाऊ जाधव या कुटूंबाची असून यासंदर्भात माहिती मिळताच तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी जाधव कुटुंबाला एकाच दिवसात सर्व शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.

दरम्यान, छत्रपती परिवाराच्या पुढाकाराने एकाच दिवसांत ५१ हजार रुपये निधी व जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचती केली आहे. आणखी मदतीची गरज असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सुरेश पवार यांनी केले आहे.

वडिलोपार्जित एक एकर जमिनीच्या तुकड्यावर कुटूंबाची गुजराण करणे शक्य नसल्यामुळे आयुष्यभर सालगडी म्हणून पंढरपूर तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील शेतकऱ्यांकडे सालगडी म्हणून ते चाकरी करीत होते.

मोलमजुरी करुन पत्नी छायाताई यांनी देखील त्यांना साथ दिली. थोरला संतोष तोही रोजंदारी करुन कुटुंबाला हातभार लावतोय पण धाकटा अंकुश मतिमंद. त्यातच संतोषच्या संसारवेलीवर मुलींच्या रुपाने तीन कळ्या फुललेल्या.

एवढ्या मोठ्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष सुरु असतानाच कुटुंबकर्त्या हरीभाऊ यांना सहा वर्षापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला आणि सारे कुटुंब आर्थिक दुष्टचक्रात सापडले.

वैद्यकीय उपचारांसाठी अर्धा एकर जमिनीचा तुकडा गमावण्याची वेळ तीन वर्षांपूर्वीच या कुटुंबावर आलेली. हरीभाऊंची जगण्याची उमेद अजूनही कायम असून वाट्टेल ती किंमत सोसून हे कुटुंब शक्य ते सर्व उपचार करीत आहे.

मूलभूत गरजांची पूर्तता देखील होत नाही, अशी स्थिती असूनही या अत्यंत गरीब व गरजू कुटूंबाला तांत्रिक अडचणीमुळे घरकूल अथवा अन्न सुरक्षा योजनेपासून दूर रहावे लागले आहे.

पती अर्धांगवायूने अंथरुणावर खिळून, मुलगा मतीमंद, उरलेला अर्धा एकर जमिनीचा तुकडा गमावून बेघर होण्याची आलेली वेळ, व्याजाने घेतलेली रकमेचा परतावा करण्याची विवंचना आणि अशातच कुटुंबाचा भार वाहणाऱ्या छायाताई यांचा हात मोडल्याने अडचणीत भर पडली आहे.

गेले पंधरा दिवस संतोषच्या शाळकरी मुलींना शाळेतून मिळालेला तांदूळ, थोड्याशा दाळी एवढ्यावर मोठे कुटूंब चरितार्थ चालवित आहे. शेजारच्या उसनवारीवर दिवस काढताना प्रसंगी गूळ पाण्यावर रात्र काढावी लागल्याची करुण व्यथा छायाताईंनी बोलून दाखविली.

याबाबतची माहिती सोशल मीडियांतून समजताच मरवडे व परिसरातील अनेक व्यक्ती व संस्थांनी मदतीसाठी हात पुढे केला असून या कुटुंबाला दुर्दैवी फेऱ्यांतून बाहेर काढण्याचा निर्धार केला असून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: तहसीलदार स्वप्नील रावडे

संबंधित बातम्या

मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
Next Post
देवमाणूस! तीन मणके खराब, अंथरुणात झोपून असलेल्या रुग्णावर गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी; पेशंट चौथ्या दिवशीच उठून बसू व चालू लागला

देवमाणूस! तीन मणके खराब, अंथरुणात झोपून असलेल्या रुग्णावर गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी; पेशंट चौथ्या दिवशीच उठून बसू व चालू लागला

ताज्या बातम्या

मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..