टीम मंगळवेढा टाइम्स । चन्नव्वा तिप्पण्णा बिराजदार ( वय ८१ रा . नरेंद्र नगर , विजापूर रोड ) या महिलेचा सांभाळ करण्याची जबाबदारी पार पाडत नसल्यानं तिची मुलगी तसेच नातवंड निलव्वा बिराजदार , ज्योती बिराजदार , विजयलक्ष्मी आणि संतोष अशा चार जणांविरुध्द जेष्ठ नागरिक पालनपोषण कायद्यान्वये विजापूर नाका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वय झाल्याने थकलेली आई, पतीचा काही वर्षांपूर्वी झालेला मृत्यू, त्यामुळे आईला पोटच्या मुलीचाच आधार होता. थकलेल्या आईला मुलीने दोनदा हाकलून देऊनही मुलीच्या ओढीने अन् जीवाच्या अकांताने आई पुन्हा मुलीकडे गेली.
मात्र, पोटच्या मुलीने व तिच्या मुलांनी (नातवंडे) चिडून तू पुन्हा घरात का आली म्हणून शिवीगाळ करीत मारहाण करुन घराबाहेर हाकलून दिल्याची घटना विजयपूर रोडवरील नरेंद्र नगरात घडली आहे. त्यानंतर मंगळवारी (ता. 25) चनव्वा बिराजदार यांनी विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले आणि मुलगी व नातवंडांविरुध्द फिर्याद दिली.
विजयपूर रोडवरील नरेंद्र नगरात आई मुलीसोबत राहायला होती.निराधार चनव्वा काही दिवस मुलीकडेच राहत होत्या. मात्र, त्या वयस्क झाल्याने काही काम करता येत नव्हते. त्यामुळे आईचा सांभाळ करणे शक्य नसल्याने पोटच्या मुलीने आठ महिन्यांपूर्वी आईला घरातून हाकलून दिले.
मुलीचा राग कमी झाला असेल, नातवंडे आजीला घरात घेतील, या आशेने आई चनव्वा तिपण्णा बिराजदार (वय- 81) मुलगी निलव्वा भिमराव बिराजदार (रा. नरेंद्र नगर) हिच्याकडे 25 ऑगस्टला पुन्हा गेली. त्यांनी मुलीकडे घरातील त्यांची पिशवी व कपडे मागितले.
थकवा आल्याने चहा करुन दे, असेही त्या मुलीला म्हणाल्या. त्यावेळी तू पुन्हा घरी का आली म्हणून मुलगी चनव्वा आणि त्यांच्या मुलांनी ज्योती भिमराव बिराजदार, विजयालक्ष्मी बिराजदार, संतोष बिराजदार यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोटच्या मुलीने घराबाहेर हाकलून दिल्याने सात महिने आई चनव्वा या डॉ. नानासाहेब अर्जून यांच्याकडेच राहत होत्या. त्यांनीच चनव्वा यांना आधार दिला. मात्र, मुलीच्या ओढीने 17 जुलै 2020 रोजी चनव्वा पुन्हा मुलीकडे गेल्या. त्यावेळीही मुलीने आईला घरात येऊ न देता बाहेर हाकलून दिले.
कोणताही आधार नसलेली आई 25 ऑगस्टला पुन्हा मुलीकडे गेली. पिशवी आणि कपडे दे, अशी मागणी त्यांनी मुलीकडे केली. मात्र, त्यांना पुन्हा तोच अनुभव आला. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुध्द ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2007 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Crime filed against daughters and grandchildren for not taking care of elderly mother in Solapur
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज