टीम मंगळवेढा टाईम्स ।
पाहुण्यांकडून जेवण करून गावाकडे येत असताना मोटारसायकल घसरल्याने सागर भारत ताड (वय 30 रा.पाटकळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री 11.30 च्या सुमारास आंधळगाव ते खुपसंगी रोड चे ब्रीज जवळ घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील मयत सागर ताड हा आंधळगाव येथील पाहुण्याच्या घरातून जेवण करून पाठखळ कडे येत होता.
रात्री 11.30 च्या सुमारास आंधळगाव ते पाटकळ येत असताना आंधळगाव ते खुपसंगी रोडच्या ब्रीज जवळ मोटारसायकल घसरून पडुन मोटारसायकल खाली सिमेंटच्या रस्त्यावर पडल्याने डोक्यास मार लागुन गंभीर जखमी होवुन मयत झाला आहे.
याची खबर मयताचा मावस भाऊ विजय गोविंद भोसले यांनी पोलिसात दिली आहे.
आंधळगावच्या डॉक्टरांची टोलवाटोलवी
दरम्यान, अपघातानंतर शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता आंधळगाव येथील डॉक्टरांना शवविच्छेदनासाठी बोलावण्यात आले होते.
मात्र तेथील डॉक्टरांनी येण्यास विरोध केला. शासनाने नवीन आदेश काढला आहे, तुम्हाला पाठवतो म्हणून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नातेवाईकांनी याचा निषेध व्यक्त केला.
आमदार समाधान आवताडे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे
आ.समाधान आवताडे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रुग्णांच्या होणाऱ्या हेळसांडी बाबत विधानसभेत आवाज उठवावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज