टीम मंगळवेढा टाईम्स । भारतीय रेल्वे प्रशासनाने कोरोना संकंटादरम्यान ४३२ पदांची भरती जारी केली आहे. विशेष म्हणजे फक्त दहावी पास उमेदवार देखील नोकरीसाठी अर्ज दाखल करु शकतात. याशिवाय, ४३२ पदांसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. त्यामुळे दहावी पास उमेदवारांना चांगला फायदा होऊ शकतो. साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेने ही भरती जारी केली आहे.
साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेने जारी केलेल्या भरतीमध्ये कोपा, स्टेनोग्राफर (इंग्रजी), स्टेनोग्राफर (हिंदी), फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक-मॅकेनिक, आर.ए.सी मॅकेनिक, वेल्डर, प्लंबर, मेसन, पेंटर, कारपेंटर, मशीनिस्ट, टर्नर आणि मेटल वर्कर अशा एकूण ४३२ पदांसाठी ही भरती जारी करण्यात आली आहे.
या पदांसाठी इच्छुक उमेदवार ३० ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज दाखल करु शकतात. या भरतीत विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे १० पास उमेदवारही अर्ज दाखल करु शकतो.
तसेच, १ जानेवारी २०२० रोजी उमेदवारांचे किमान वय १५ वर्षे असले पाहिजे परंतु २४ पेक्षा जास्त नसावे. उमेदवार secr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करू शकतात. उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्टनुसार केली जाईल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज