टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संचालकपदी सत्ताधारी गटाकडून मंगळवेढा तालुक्यातील चौघेजण निवडून आले आहेत. यात ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे, औदुंबर वाडदेकर, जयंत साळे व पंचायत समितीच्या माजी सभापती निर्मला काकडे यांचा समावेश आहे.
तर अध्यक्षपदासाठी बबनराव आवताडे व रणजितसिंह शिंदे यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र आवताडे यांचे नाव आघाडीवर आहे.
पहिल्यांदाच संघाच्या निवडणुकीत उतरलेले पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यासह पॅनेल निवडून आणण्यासाठी आमदार बबनराव शिंदे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. ते यात विजयी झाले.
तर औदुंबर वाडदेकर व जयंत साळे हे दुसऱ्यांदा संघाचे संचालक झाले आहेत, तर पहिल्यांदाच निवडणूक लढवत विजय मिळवलेल्या निर्मला तानाजी काकडे या भोसे गावातील आहेत. चौघेजण निवडून आल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.
तसेच समर्थकांनी मंगळवेढा शहरात ठिकठिकाणी व आपापल्या गावाबरोबर दूध संघाच्या कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला.
दरम्यान, दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे व मंगळवेढ्याचे बबनराव आवताडे यांच्या नावांची चर्चा आहे. आवताडे यांच्या नावावर सत्ताधारी गटात एकमत होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज