टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढयाचे ग्रामदैवत हजरत गैबीपीर ऊरूस कमिटीची बैठक आज रविवारी सायंकाळी ७.०० वा. गैबीपीर दर्गाहमध्ये होणार असल्याची माहिती सरपंच प्रशांत गायकवाड यांनी दिली.
गैबीपीर ऊरूस कमिटीच्या बैठकीमध्ये वार्षिक जमा खर्चाचा लेखाजोखा व चालू वर्षाचा आढावा सादर केला जाणार आहे.
सरपंच प्रशांत गायकवाड यांनी आतापर्यंत विविध समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेतले असून गरजू व गरिबांना मदतीचा हात दिलेला आहे.
गैबीपीर देवस्थानच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामगिरी उत्तम रित्या पार पाडली आहे.
तरी मंगळवेढयातील नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज