टीम मंगळवेढा टाईम्स ।
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. चारच दिवसांपूर्वी ३० जानेवारी रोजी त्यांनी आपला ९३वा वाढदिवस साजरा केला होता.
त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या.
१९५१ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
१९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
रमेश देव हे अभिनेता तर होतेच पण ते निर्माता, दिग्दर्शक हि होते. त्यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ कोल्हापुर यथे झालेला.असंख्य हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या.
बॉलीवूड मधल्या राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्यापासून ते त्याहून जुन्या आणि अगदी अलीकडच्या सुपर हिरोंबरोबर देखील त्यांनी काम केलं. बहुतेक वेळा रमेश देव आणि त्यांच्या पत्नी सीमा देव हे दोघेही रसिकांना सिनेमाच्या पडद्यावर नुसते दिसलेच नाही तर भावले देखील.
अगदी ब्लॅॅक अँँड व्हाईट सिनेमा असेल फ्युजी कलर सिनेमा असेल आणि नंतरचा सिनेमास्कोप असेल इस्टमन कलर असेल अशा नानाविध सिनेमात नाना विध भूमिका या दोहोंनी एकत्र रंगविल्या.
बहुतेक चित्रपटात त्यांनी खलनायक सादर केला .’आनंद’ आणि ‘तकदीर’ या चित्रपटातील भूमिकांनी त्यांना चांगलीच लोकप्रियता दिली देव यांनी ‘आंधळा मागतो एक डोळा ‘ (१९५६) या चित्रपटातून करमणूक उद्योगात पदार्पण केले. त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘आरती’ होता.
मराठीसह हिंदीतही दर्जेदार अभिनय
रमेश देव यांनी आतापर्यंत 280 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलेले आहे. रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीत आपला काळ गाजवला. फक्त मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही रमेश देव यांनी दर्जेदार भूमिका वढवल्या होत्या.
शंभर वर्ष जगण्याची इच्छा
रमेश देव यांच्या निधनावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी बोलताना दुःख व्यक्त केलं आहे. 26 जानेवारी रोजी झालेल्या गप्पामध्ये रमेश देव यांनी आपल्याला शंभर वर्ष जगायचंय अशी इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, वाढदिवशी जेव्हा अशोक सराफ यांच्यासोबत रमेश देव यांचं बोलणं झालं होतं,
तेव्हा अशोक सराफ यांनाही रमेश देव यांचा आवाज बदलल्या बदलल्या सारखा आणि थकल्यासारखा जाणवला होता. अखेर दोन दिवसांनी त्यांच्या निधनाची बातमी ऐकून अशोक सराफ यांनाही धक्का बसला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज