टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा नगरपरिषदेचा पाण्याचा टँकर ठेकेदार वापरत होता त्याचा युवा मोर्चा कडून खुलासा करण्यात आला. दि.25 जानेवारी रोजी सदरील टँकर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर लावून परिषदेच्या आवारात लावला आहे.
तीन दिवसांपूर्वी युवा मोर्चा तर्फे मुख्याधिकारी याना भेटून सदरील टँकर वापरल्या बाबत ठेकेदाराकडून भाडे वसूल करावे करावे म्हणून निवेदन देण्यात आले. पण तीन दिवस झाले तरी नगरपरिषदेच्या माध्यमातून कोणतीही कारवाई झाली नाही.
आज युवा मोर्चा च्या माध्यमातून नगरपरिषदेच्या आवारात संबळ वाजवून संबळनाद आंदोलन करण्यात आले. व जोपर्यंत भाडे वसूल करत नाही तोपर्यंत आवारातून उठणार नसल्याचे सांगितले.
या आंदोलनात बोलताना युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव म्हणाले, गेल्या तीन दिवसांपूर्वी आम्ही निवेदन दिले होते पण कोणतीच कारवाई झाली नाही.
आज आम्ही मुख्याधिकारी याना भेटलो तर त्यांची उडवाउडवीची उत्तरे आली. पण आम्ही टँकर चे भाडे वसूल करा अन्यथा उठणार नाही.
जनतेला एक न्याय आणि ठेकेदारांना एक न्याय हे चालु देणार नाही.अश्यपद्धतीचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या सर्व प्रकरणाला मुख्याधिकारी जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
“टँकरचे भाडे मिळाले पाहिजे, कोण म्हणतं देत नाही, मुख्याधिकारी एक काम करो, खुर्ची छोडो अराम करो, ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे.” अश्यपद्धतीच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
दीड तास आंदोलन चालल्यानंतर मुख्याधिकारी यांनी ठेकेदार याच्या नावे नोटीस काढली, त्यामध्ये तुम्ही तुमचा टँकर आहे म्हणत आहे तर तसे तीन दिवसात पुरावे द्यावे अन्यथा नगरपरिषद प्रशासन रीतसर कारवाई करेल. असे नमूद केले आहे.
सर्व पुरावे समोर आहेत, मुख्याधिकारी पासून सर्वा अधिकाऱ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, टँकर हा नगरपरीषदेचाच आहे, हे सर्व नाटक चालू आहे, तीन दिवसात टँकरचा घोळ समोर येईल व ठेकेदारावर कारवाई नक्की होईल अशी प्रतिक्रिया सुदर्शन यादव यांनी दिली आहे.
याप्रसंगी भाजयुमो शहराध्यक्ष सुशांत हजारे, सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदुस्थानी, बबलू सुतार, शहर सरचिटणीस अजित लेंडवे, ओंकार म्हेत्रे, उपाध्यक्ष रोहित हिरेमठ, सचिव अविनाश मेटकरी, मतीन दरवाजकार, संकेत लांडे, सचिन हेंबाडे, उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज