टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील भिमा नदीपात्रातून बेकायदा वाळू वाहतुक करणारा अशोक लेलंड कंपनीचे वाहन पोलिसांनी जप्त करून अनिकेत गायकवाड, रवी अवघडे या दोघांविरूध्द वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील आरोपी यांनी दि.29 रोजी 12.30 च्या दरम्यान शहरातील नागणेवाडी ते आण्णाभाऊ साठे चौकाकडे जाणारे वाळूचे अशोक लेलंट वाहन पोलिसांनी पकडून तपासणी केली असता
सदर वाहनात 7 हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू मिळून आली. पोलिसांनी वाळूसह 2 लाखाचे वाहन जप्त केले आहे.
याची फिर्याद पोलिस हवालदार श्रीमंत पवार यांनी दिल्यावर वरील दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस धानगोंडा हे करीत आहेत.
दरम्यान महसूल विभागाच्या पथकांची कारवाई थंड असल्याने वाळू चोरीला बळ मिळत आहे.
तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी भिमा व माण नदीकाठच्या भागातील तलाठयांची पथके पुन्हा कार्यरत करून शासनाच्या होणार्या मालाची चोरी थांबवावी अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज