mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्याच्या तरुणाने केली कोट्यवधींची फसवणूक, गुन्हा दाखल; आकडा 200 कोटींच्या वर असल्याचा दावा!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 14, 2022
in क्राईम, मंगळवेढा, राज्य
मंगळवेढ्याच्या तरुणाने केली कोट्यवधींची फसवणूक, गुन्हा दाखल; आकडा 200 कोटींच्या वर असल्याचा दावा!

टीम मंगळवेढा टाईम्स। 

बार्शी आणि सोलापुरातील अनेकांना कोट्यवधींचा चुना लावून विशाल फटे  सध्या फरार आहे. त्याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींना मोठा फटका बसला आहे, अशी चर्चा सुरु आहे तर अनेक गोरगरीबांना देखील विशाल फटेनं चुना लावला आहे.

या प्रकरणात विशाल फटेसह पाच जणांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु होती.

मात्र कुणी गुन्हा दाखल करायला समोर येत नव्हते. आज अखेर दिपक अंबारे यांनी विशाल फटेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अंबारे यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, अलका शेअर्स सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून तो शेअर्स मार्केटमध्ये विशाल फटे पैसे गुंतवायचा. शेअर्स मार्केटमधून मिळालेला फायदा तो आम्हाला दाखवत होता.

विशालका कन्सल्टन्सी सर्विसेस प्रायवेट लिमिटेड, अलका शेअर्स सर्विसेस, जे.एम. फायनान्सीयल सर्व्हिसेस या कंपन्या त्यानं चालू केल्या होत्या.

या कंपनी मार्फत त्याने शेअर्समध्ये वेगवेगळया कंपन्यांमध्ये बार्शी तसेच इतर भागातील नागरिकांकडून शेअर्स मार्केट मध्ये शेअर्स घेण्याकरिता मोठ्या रकमा वरील कंपन्यांच्या खात्यामध्ये घेतल्या असं अंबारे यांनी म्हटलं आहे.

आकर्षक परतावा देण्याचे आमिष, व्यवहाराबाबत मात्र माहिती नाही
पैशांच्या मोबदल्यात गुंतवणूकदारांना तो आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवित होता.

तो काही लोकांकडून आर.टी.जी.एस. मार्फत किंवा चेकमार्फत किंवा रोख रक्कम घेऊन त्याच्या वरील कंपन्यामार्फतीने व्यवहार करायचा. त्याचा व्यवहार कोणत्या पध्दतीने चालू आहे हे तो कोणास सांगत नसे.

फक्त काही वेळेस कोणाला रोख रक्कम दयायची असल्यास माझे एच.डी.एफ.सी. च्या खात्यामध्ये रक्कम जमा करत असे, ती रक्कम मी काढून त्यास ऑफिसला नेवून देत होतो, असं अंबारे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

तक्रारीत नेमकं काय म्हटलंय…

शेअर्स मार्केटमध्ये विविध प्रकारे गुंतवणूक करुन जास्त नफा मिळवून देतो असे अमिष दाखवून मला त्याने त्याच्या कंपनीमध्ये माझी व माझ्या पाहुण्यांची रक्कम गुंतवण्यास विश्वासाने भाग पाडले.

विशाल फटे हा गुंतवणूकदारांची रक्कम ही शेअर्स मार्केट मधील आय.पी.ओ. ग्रे मार्केट मध्ये गुंतवणूक करीत आहे असे सांगत असे.

आय.पी.ओ. महिन्यातून 2 ते 3 वेळा असते. त्यामध्ये 15 ते 20 टक्के नफा होत असतो. त्यामुळे महिन्यास गुंतवलेल्या रक्कमेवर अंदाजे 30 ते 35 टक्के नफा मिळत असल्याबाबतची शेअर्स मार्केट मधील

अल्गो ट्रेडींग ही नवीन संकल्पना त्याने तयार करुन या ट्रेडींग बद्दल त्याचा भरपूर अभ्यास असल्याचा भासवून त्याने मला माझे नातेवाईकांना तसेच मित्रांना व बार्शी शहरातील व परिसरातील इतर लोकांना ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवून दररोज 2 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते.

त्यामुळे परिसरातील लोकांनी त्याचेवर विश्वास ठेवून मोठया प्रमाणात त्याचे वरील कंपनीमध्ये पैसे गुंतविले होते. विशाल अंबादास फटे यांच्यावर असलेल्या

विश्वासामुळे व त्याच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे त्यांनी दाखवलेल्या अमिषाला बळी पडून मी माझे स्वत:चे, माझ्या स्वत:च्या सख्या भावाचे व माझ्या नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेतले.

अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा

या प्रकरणी अंबारे यांच्या तक्रारीनंतर विशाल अंबादास फटे, राधिका विशाल फटे, अंबादास गणपती फटे, वैभव अंबादास फटे, अलका अंबादास फटे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केवळ अंबादे यांनी तक्रार केली असली तरी या प्रकरणात अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. बार्शी तालुक्यात फसवणुकीचा आकडा 200 कोटींच्या वर असल्याचा दावा देखील काही पोस्टमधून करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी बडे नेते, अधिकारी यांच्याशी आपले चांगले संबंध असल्याचं लोकांना सांगायचा. त्यांच्यासोबतचे फोटो दाखवून लोकांना तशी खात्री करुन द्यायचा, अशी माहिती देखील आहे.

तीन महिन्यात दाम दुप्पट पैसे देण्याचे आमिष

विशाल फटे हा बार्शीत शेअर ट्रेडिंग कंपनी चालवत होता. सुरुवातीला त्याने कंपनीच्या नावाखाली लोकांकडून लाखो रुपये घेतले. त्यांना मोठा परतावा देऊन लोकांचे विश्वास संपादन केले. त्यानंतर तीन महिन्यात दाम दुप्पट देण्याचे आमिष त्याने अनेकांना दिले.

आधी दिलेल्या परताव्यवरून अनेकांनी विश्वास ठेवुन कोट्यवधी रुपये फटे यांच्याकडे गुंतवणूकिसाठी दिले होते. मात्र मागील काही दिवसांपासून फटे याचा मोबाईल बंद आहे.

बार्शीतल्या घरी कोणीही नाहीये तर बार्शीतल्या उपळाई रोडवर असलेल्या कार्यालयाला देखील कुलूप आहे. त्यामुळे फटे पसार झाल्याच्या चर्चा मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू होत्या.

अनेक नेते उच्च पदस्थ अधिकारी, उद्योजकांसोबत फोटो दाखवून लोकांना भुरळ

अनेक डॉक्टर्स, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी, नामवंत व्यक्ती अशा अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या फटेकडे केली होती अशी चर्चा आहे. हा आकडा दोनशे कोटींहून अधिकचा असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

मात्र आता या क्षणाला किती आकडा आहे हे संगणे शक्य नसल्याची प्रतिक्रिया अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी दिली.

मागील 3 दिवसापासून सुरू असलेल्या या चर्चाबाबत कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नव्हते. मात्र अखेर काल दीपक बाबासाहेब अंधारे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

दाखल झालेल्या या फिर्यादीनुसार 5 कोटी 63 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक या व्यक्तींची झाली आहे. मात्र हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अनेक उच्च पदस्थ अधिकारी, उद्योजक यांच्यासोबत काढलेले फोटो दाखवून विशाल फटे लोकांना भुरळ पाडत होता. मोठा परतावा देण्याचे आश्वासन मिळाल्याने अनेक जणांनी कर्ज काढून, जमीन, सोने गहाण ठेवून पैसे गुंतवल्याची माहिती आहे.

विशालकडे ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली होती. अशांनी पुढे येऊन पोलिसांकडे फिर्याद द्यावे असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.(स्रोत:ABP माझा)

कोण आहे विशाल फटे?

विशाल फटे हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हजापुर येथील आहे.

सध्या बार्शीतील अलीपुर रोड ते उपळाई रोड दरम्यान तो राहायला होता, बार्शीतल्या शिवाजी महाविद्यालयासमोर त्याचे नेट कॅफे होते, मागील 10 ते 15 वर्षांपासून आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असल्याचे तो लोकांना सांगायचा

अलका शेअर सर्व्हिसेसचे संस्थापक, विशालका कन्सल्टंट सर्व्हिसेसचे संचालक, फोग्स ट्रेडिंग कंपनी व्यवस्थापकीय संचालक

NSEBSE चे सदस्य असल्याची माहिती तो लोकांना सांगायचा, 2019 पासून बार्शीत त्याने अनेकांकडून गुंतवणूक करून घेतली, त्यातील काही जणांना 28 टक्के परतावा दिला

मागील तीन महिन्यात अनेकांनी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली, काही दिवसांपूर्वी 10 लाख गुंतवल्यास वर्षाला 6 कोटी रुपयांचा परतावा मिळेल असे आमिष दाखवले

27 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते त्याला एका वाहिनीचा पुरस्कार देण्यात आला होता, त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली, 9 जानेवारीपासून फोन बंद असून, बार्शीतून गायब झाल्याची तक्रार

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बार्शी पोलीस निरीक्षकविशाल फटे

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 15, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
Next Post
सोलापूर ब्रेकिंग! जिल्ह्यात येणाऱ्या संशयितांची सोलापूरच्या सीमेवरच कोरोना टेस्ट

सोलापूर! 'या' तालुक्यात सर्वाधिक रुग्ण, शुक्रवारी ४०९ कोरोनाबाधित; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यासह ४१ डॉक्टर पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 15, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा