सोलापूर । अक्कल्कोट तालुक्यातील हालहळ्ळी येथील मर्चंट नेव्हीतील अधिकार्यावर हल्ला केल्याप्रकरणी हालहळ्ळीच्या माजी सरपंचासह पाच आरोपींना कर्नाटकात पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. Attack on Merchant Navy officer; 5 people including former sarpanch in police custody
फिर्यादी मर्चंट नेव्हीतील अधिकारी नागनाथ परमेश्वर हुक्केरी सुटीसाठी गावी आले असता कट रचून आरोपीने लोखंडी रॉड, दगड, कुर्हाड व दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी 23 जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यातील संशयित आरोपी माजी सरपंच निलप्पा बिराजदार, त्याची मुले खंडेशा बिराजदार, भागेश बिराजदार, पुतणे मल्लिनाथ बिराजदार, गुरुनाथ बिराजदार (सर्व रा.हालहळळी) हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. पोलिस निरीक्षक राजेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विलास नाळे व डी.बी. पथकातील पोलिसांनी कन्नाळ (ता. इंडी, जि.विजापूर) येथे धडक मारली.
आरोपी हे गावाबाहेरील एका शेतातील तुरीच्या पिकात लपून बसले होते. पोलिस येत असल्याचे कळताच ते पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांचा पाठलाग करुन पाचही आरोपींना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलिस निरीक्षक राजेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Attack on Merchant Navy officer; 5 people including former sarpanch in police custody
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज