टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मरवडे येथे विषबाधेने दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.मयत मुलीचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
भक्ती आबासाहेब चव्हाण ( वय- 6) व नम्रता आबासाहेब चव्हाण ( वय-4) या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
लहान मुलींसाठी मंगळवेढा येथील एका दुकानातून खाऊ आणला होता. खाऊ आणल्यानंतर मुलीही खूश झाल्या.
सर्वांनी मिळून खाऊ खाल्यानंतर चव्हाण कुटुंबातील सर्वांनाच अस्वस्थ वाटू लागलं. यानंतर सर्वांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
यावेळी उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे मोठी मुलगी भक्ती हिचा मृत्यू झाला. चिमुकल्याचा हृदयद्रावक शेवट त्यानंतर काही वेळाने दुसरी मुलगी नम्रता हिचा मृत्यू झाला.
गुरुवारी मध्यरात्री पंढरपूर येथील खाजगी दवाखान्यात झाला त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत मुलीचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे. हा खाऊ कुठून आणला याबद्दल तपास केला जात आहे. दोन चिमुरड्यांच्या मृत्यूमुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकरणानंतर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे(स्रोत:News 18 लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज