समाधान फुगारे । मास्क नसल्यास वस्तू मिळणार नाही.मंगळवेढा व्यापारी महासंघाने बाजापेठेच्या सुरक्षेसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मंगळवेढा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात जनजागृतीसाठी प्रत्येक दुकानदार आपल्या दुकानाच्या दर्शनी भागात मोठ्या प्रमाणात फलक लावत आहेत.
जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे. सर्वशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, व्यापारी, दुकानदार या ठिकाणी मोहिमेच्या प्रचारासाठी स्टिकर्स लावले जात आहेत.
तालुक्यातील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना विना मास्क वस्तू देऊ नये तसेच संबंधित दुकानदारानेही मास्क् न लावल्यास त्याच्याकडूनही ग्राहकांनी खरेदी करु नये यासाठी मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तू नाही असे फलक दुकानदार दर्शनी बाजूस स्वत:हून लावत आहेत.
त्याचबरोबर दुकानदाराने मास्क लावला नसेल तर ग्राहक त्याच्या दुकानात प्रवेश करणार नाहीत. अथवा वस्तू घेणार नाहीत या आवाहनालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुकानदारांने मास्क वापरला नसेल तर त्या दुकानदारावरही कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आवाहनानुसार निर्णय
कोरोना संकट टाळण्यासाठी प्रत्येक दुकानदाराने मास्क लावूनच मालाची विक्री करायची तर ज्या ग्राहकाच्या तोंडाला मास्क नाही त्यांच्याशी व्यापार न करण्याचा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आवाहनानुसार हा महत्वपूर्ण निर्णय मंगळवेढा व्यापारी महासंघाने घेतला आहे.-अरुण किल्लेदार, सचिव व्यापारी महासंघ मंगळवेढा
No mask then no objects; An important decision of the mangalwedha Traders Federation, if there is no mask, the goods will not be available.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज