टीम मंगळवेढा टाईम्स ।
माझी वसुंधरा हा उपक्रम राज्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्य शासनाच्या महत्वकांक्षी उपक्रमाची सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर मार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
माझी वसुंधरा या उपक्रमांत जिल्हयातील ७०८ ग्रामपंचायतींनी या अभियान करिता स्वयंस्फूर्तनि नोंदणी करून घेतलेली आहे.
जिल्ह्यातील ६२६ ग्रामपंचायतींनि फटाके बंदीचे’ ठराव केलेले आहेत माझी वसुंधरा विविध अंतर्गत कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
घन कचरा व्यवस्थापन , वृक्ष लागवड , प्लास्टिक बंदी, हागणदारी मुक्ती , जलसंवर्धन, नदी / तळेपुनर्जीविकरण , सांडपाणी उपक्रमांचा या व्यवस्थापन समावेश आहे.
तालुकानिहाय फटाके बंदीचा ठराव घेतलेल्या ग्रामपंचायतीची संख्या या प्रमाणे :
मंगळवेढा – ५० ,अक्कलकोट – ८२ , बार्शी ६३ , करमाळा माढा ९ २ , माळशिरस मोहोळ – ५५ , पंढरपूर ७२ , सांगोला ४६ , उत्तर सोलापूर दक्षिण २४, सोलापूर ३२.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी याबाबत घेतलेल्या सततच्या आढावा बैठक व मार्गदर्शनामुळे ग्रामपंचायतींनी फटाके बंदीचा ठराव घेतला आहे.




बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














