टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा कोविड लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याची येथे माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. एन.बी. पवार यांनी दिली.
ते म्हणाले की, जागतिक कोरोणा महामारी पासून वाचण्यासाठी लसीकरण हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे ज्यांना पहिला डोस घ्यायचा आहे किंवा दुसरा डोस ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी आज सकाळी दहा वाजता महाविद्यालयात यावे सोबत आधारकार्ड आणावे आणि जेवण करून यावे.
मदनसिंह मोहिते पाटील महाविद्यालय मंगळवेढा, ह.रा. कवचाळे महाविद्यालय बोराळे येथील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन लसीकरण करून घ्यावे महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे नातेवाईक इतर नागरिक यांनीही या लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे असे ते म्हणाले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो.डॉ. अशोक माने, प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, प्रा.धनवे आदी परिश्रम घेत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज