टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर परिसरात विष्णू शिवाजी लोखंडे (वय 19 रा.धोंडेवाडी ता. पंढरपूर) हा मध्यरात्री 1.30 वा. संशयीतरित्या अंधारात दबा धरून बसलेल्या स्थितीत मिळून आल्याने पोलिसांनी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी पोलिस शिपाई मनोहर भोसले,पोलिस हवालदार कुंभार,पोलिस नाईक पांढरे,पोलिस शिपाई हत्ताळी हे दि.22 रोजी रात्रीची गस्त घालत असताना
या दरम्यान मंगळवेढा ते पंढरपूर रोडवर बायपास येथे ते आले असता हॉटेल शिवनेरीच्या दक्षिणेस भिंतीलगत एक इसम अंधारात संशयितरित्या आपले अस्तित्व लपवून दबा धरून बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
गस्ती पथकास पाहून तो पळू लागला.त्याचा पाठलाग करून पोलिसांनी रात्री 1.30 वा. पकडले.चौकशीदरम्यान सुुरुवातीला त्याने उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली.
पोलिसांनी विश्वासात घेवून त्याचे नाव,गाव विचारले असता विष्णू शिवाजी लोखंडे रा.धोंडेवाडी असल्याचे सांगून काही एक कामधंदा नसल्याने मालाविषयी गंभीर गुन्हा करण्याच्या इरादयाने बसल्याचे त्याने पोलिसांना त्याने सांगितले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याच्याविरूध्द कलम 122(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलिस नाईक दत्ताजी निंबाळकर हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज