mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळ! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील कर्मचारी अजित मिसाळ व गणेश पवार यांच्या विरोधात लाच घेतल्याची तक्रार; उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 18, 2021
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
खळबळ! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील कर्मचारी अजित मिसाळ व गणेश पवार यांच्या विरोधात लाच घेतल्याची तक्रार; उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरू

पोलिसांनी घेतली लाच , उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी

टीम मंगळवेढा टाइम्स ।

अडवलेला अवैध वाळू वाहतुकीचा टेम्पो सोडण्यासाठी येथील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांनी ७० हजारांची लाच मागितली . तसेच दोघा व्यक्तींच्या समोर त्यापैकी ४० हजार रुपये घेतल्याच्या तक्रारीची पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे चौकशी दिली आहे . पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्यांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत .

अवैध वाळूची वाहतूक करणारी गाडी अडवून पोलीस कर्मचारी अजित मिसाळ व गणेश पवार यांनी ४० हजार रूपये घेतले असून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची लेखी तक्रार मंगळवेढा येथील अजय बाळासाहेब नाईकवाडी (रा . हजारे गल्ली) याने पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली होती.

वाळू कारवाईवरून पोलिस कर्मचार्‍याला वाहनाखाली चिरडून मारल्याची घटना ताजी असताना चक्क वाळूवरील कारवाई टाळण्यासाठी दोघा पोलिस कर्मचाऱ्यांनी 70 हजार रुपये लाचेची मागणी करून 40 हजार रुपये स्वीकारल्या प्रकरणी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली.

निवेदनाची प्रत पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे करण्यात आली.

याबाबतची तक्रार अजय बाळासाहेब नाईकवाडी रा.हजारे गल्ली यांनी केली असून यासंदर्भात दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, 11 ऑक्टोबर रोजी रात्री 12.30 वाजता अन्नपूर्णा हॉटेल ते दामाजी कारखाना पर्यंत ईरटीका या गाडीने पाठलाग करत वाळू वाहतूक करणारा टेम्पो अडवून 70 हजार रुपयांची मागणी केली एवढी रक्कम देणे शक्य नाही

म्हटल्यावर कारवाईची भीती दाखवली कारवाईची भीतीने पहाटे 4 वाजेपर्यंत रुपये 40 हजार रोख कॅश दोघा मित्राच्या साक्षीने दिली.

यासाठी स्थानिक पोलिस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्याला पाठबळ मिळत आहे. सदर कारवाई दरम्यान उपस्थित असलेले पोलिस कॉन्स्टेबल अजित मिसाळ यांची यापूर्वी पोलिस मुख्यालयात बदली झाली असतानाही

परंतु आर्थिक मिळगत चांगली असल्याने वसुलीसाठी तो मंगळवेढा येथे कार्यरत असून त्या कर्मचाऱ्यांची दहशत असून त्यांच्यावर कारवाई साठी कोणीही पुढे येत नसल्याने या कर्मचाऱ्यांपासून पोलीस संरक्षण मिळावे. अशी मागणी करत असल्यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन होत आहे.

भीमा व माण नदीच्या खोऱ्यातील अवैध वाळू उपसा प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या परीसराबरोबर आता लाचखोरी प्रकरणामुळे पोलीसही पुन्हा चर्चेत आले.(स्रोत:सकाळ)

चुकीची तक्रार करणाऱ्यांवर देखील कारवाई होणार

यासंदर्भातील तक्रार आपल्याकडे आली नसून तक्रार प्राप्त झाल्यानंतर यावर चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल. शिवाय चुकीची तक्रार करून पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाईल – ज्योतीराम गुंजवटे, पोलिस निरीक्षक

पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे चौकशी

अडवलेला अवैध वाळू वाहतुकीचा टेम्पो सोडण्यासाठी येथील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांनी ७० हजारांची लाच मागितली . तसेच दोघा व्यक्तींच्या समोर त्यापैकी ४० हजार रुपये घेतल्याच्या तक्रारीची पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे चौकशी दिली आहे . पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्यांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत .

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याप्रकरणी माझ्याकडे चौकशी दिली आहे . शनिवारी हा आदेश मिळाला आहे . या घटनेची चौकशी केली जाईल . निरपराध व्यक्तींवर अन्याय होणार नाही . निःपक्ष चौकशी करून आहवाल देण्यात येईल – विक्रम कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपूर

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अजित मिसाळमंगळवेढा पोलीस स्टेशन

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
Next Post
अरे वा! युटोपियन शुगर्सने केली शेतकऱ्यांची दिवाळी गोड; ऊस उत्पादकांना २०० रुपयांची भेट, कामगारांनाही बोनस

युटोपियन शुगर्सचा आज ८ वा गळीत हंगाम शुभारंभ; यांच्या हस्ते होणार पूजन

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 4, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..