टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर व तालुक्याच्या पूर्व भागात शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
मंगळवेढा-बोराळे, बोराळे ते रहाटेवाडी, तांडोर-तामदर्डी ते रहाटेवाडी या गावाला दळणवळण असणाऱ्या पुलावर पाणी आल्यामुळे या गावाची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
पावसामुळे शहरात विद्युत पुरवठा खंडित झाला. नगरपालिकेच्या अनेक व्यापारी गाळ्यांमध्ये पाणी आल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान नव्याने झाले आहे.
मंगळवेढा ४५ , मरवडे १३ , आंधळगाव ५३ , मारापूर ४० , भोसे ९ , बोराळे ५ ९ , हुलजंती ७ , सरासरी ३२.२८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर नव्याने झालेल्या पाठखळ महसूल मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले नाही.
अचूक पावसाची नोंद होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी गावोगावी पर्जन्यमापक यंत्र बसवावेत अशी मागणी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज