टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोविडच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात गणेश मूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मंडळांनी भाविकांना उपलब्ध करून द्यावे. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे. तसा आदेश त्यांनी काढला आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात आदेश काढले आहेत.
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसार प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टंसिंग) तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनिटायझर इत्यादी पाळण्याकडे विशेष लक्ष मंडळांनी द्यावे.
या ऐवजी गणेशमूर्तींचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनीय कायदेशीर कारवाई कारवाई करण्यात येईल.
पोलीस ठाण्यांना सूचना
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी व इतर कायदे आणि नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे.
संबंधित पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज