टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ ऊस बिलातील एफ आर पी मिळणेबाबत , कारखान्यावर वाढलेल्या कर्जाच्या बोजाबाबत तसेच कारखाना कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारीबाबत विचार विनिमय करणेसाठी
कारखान्याच्या सभासद शेतकरी बंधूंची सर्व पक्षीय बैठक आज रविवार दि ५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता मल्लिकार्जुन मंगल कार्यालय , बोराळे – सिध्दापूर रोड येथे आयोजित केली आहे.
सदर बैठकीस माजी संचालक यादाप्पा माळी, माजी सभापती राजाराम जगताप, मंगळवेढा सूतगिरणीचे चेअरमन दत्तात्रय लाळे, पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक अॅड.भारत पवार, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख, कट्टे उद्योग समुहाचे प्रमुख संजय कट्टे, जि.प.सदस्य नितीन नकाते , शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम कुदळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अॅड.राहुल घुले,
सावता माळी , आर . पी.आय. तालुकाध्यक्ष अशोक शिवशरण , दामाजीचे माजी चेअरमन शशिकांत बुगडे , पंचायत समिती सदस्य रमेश भांजे , युवक नेते तानाजी खरात , वसंत गरंडे हे उपस्थित राहून मार्गदर्षन करणार आहेत.
तरी या बैठकीस सर्व ऊस उत्पादकांनी बहु संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीधर खांडेकर, युवराज गडदे , सुब्राव बेदरे, रविंद्र पुजारी , सुनिल डोके जगदिश पाटील, हरिभाऊ मळगे , दयानंद सोनगे, जगन्नाथ कोकरे , शिवाजी मोहिते , श्रीमंत मोहिते , श्रीमंत केदार, विठ्ठल आसबे आदिंनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज