टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी व भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काल नगरपालिकेसमोर भाजपाने विकासकामाच्या 12 प्रश्नाबाबत आंदोलन केले.
मात्र हे आंदोलन पदाधिका-यांचे अतिक्रमण वाचवण्यासाठी केलेली स्टंटबाजी असल्याचे प्रत्युत्तर नगराध्यक्षा अरूणा माळी यांनी दिले.
या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना नगराध्यक्षा माळी म्हणाल्या की,पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते विविध विकास कामे करण्याबाबतचा ठराव केला. विविध योजनेतून निधी प्राप्त करून शहरात विविध विकास कामे सुरू आहेत.
शहरातील सांगोला नाका परिसरात सि.स.नं. 4054 या जागेत बगीचा विकसित करण्याचे काम सुरू असून.हे काम पुर्ण झाल्यावर आद्य क्रांतीविर उमाजी नाईक याचा पुतळा त्या जागेत बसविण्याचे असताना त्या जागेत भाजपाच्या एका पदाधिका-याने अतिक्रमण करत त्या सदर ठिकाणी बिल्डींग मटेरियलचा व्यवसाय सुरू केला.
सदर जागेत काही नागरिकांची अनाधिकृत घरे असून घरकुल योजनेमध्ये त्यांचा कोठेही समावेश केला नाही. सदर पदाधिका-यांचे अतिक्रमण वाचविणेसाठी आमदार व इतर पदाधिका-याची इच्छा नसताना सुध्दा त्यांना व पक्षाला वेठिस धरून स्वता:च्या स्वार्थासाठी आंदोलनाचा स्टंट केला.
दामाजी चौक ते शिवप्रेमी चौक रस्ता डांबरीकरण करणे कामाचा आदेश चेतन कंस्ट्रक्शन कंपनीस देण्यात आलेला असून पावसाळ्यानंतर सदरचे काम तात्काळपुर्ण करण्यात येणार आहे.
शहरातील क्रॉक्रिट कामा संदर्भात पुर्वीचे रस्ते उंच आहेत आशा ठिकाणी खोदाई करूनच रस्ते कॉक्रिटीकरणाचे काम केले आहे व अजुन काही कामे सुरू आहेत.
दामाजी पुतळा सुशोभिकरणाच्या काम भाजपाच्या एका कार्यकत्याने घेतले असून काम सुरू करण्याचा आदेशही देण्यात आले. तसेच भाजी मंडईतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणाचे अंतिम टप्यातील काम लवकर पुर्ण करण्यासाठी ठेकेदारास नोटीस दिली.
शहा बँकेसमोरील मोकळ्या जागेमध्ये पेव्हर ब्लॉक टाकून अतिक्रमण होवू नये म्हणून कठडा बांधण्याचे काम व माजी नगराध्यक्ष स्व.रतनचंद्र शहा यांच्या पुतळाचा चबुतरा बांधकामाचे काम सुरू करण्याचा आदेश ठेकेदाराला दिला असून जाणूनबुजून विरोध करित आहे.
कोरोना काळामध्ये नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचा-यांनी जिवाचे रान करून शहरातील स्वच्छता, जंतुनाशके फवारणी तसेच स्मशानभूमी मध्ये स्वता:चा जिव धोक्यात घालून अंत्यसंस्कार करण्याचे काम कर्मचा-यांनी केलेले असून
सध्याही शहरातील स्वच्छता, गटार सफाई करणे, झाडकाम करणे, जंतूनाशके फवारणी करण्याचे काम केल्यामुळे पालिकेला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये बक्षिसही मिळाले. शनिवार पेठ भागात विकास कामे होत नसल्याबाबत आरोप केले.
परंतु दोन ठिकाणी बगीचा विकसीत करण्याचे काम सुरू असताना स्वता:चे अतिक्रमण वाचवण्यासाठी सदरची विकास कामे बंद पाडण्याचा कुटील डाव सदर पदाधिका-याने केला. शहरातील विकास कामे कशी चांगली होतील कामचा दर्जा कसा असावा व विविध विकास कामांसाठी जास्तीचा निधी उपलब्ध होवून
शहराचा विकास आणखी कसा होईल या करिता आमदार महोदयांनी पाठिंबा द्यावा. विकास कामे आडविण्याचा प्रयत्न करणा-या विघ्नसंतोषी लोकांना पाठीशी घालू नये.असा सल्ला नगराध्यक्षा माळी यांनी दिला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज