टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर, संत दामाजी नगर ग्रामपंचायत व संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत मधील सर्व व्यावसायिकांना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांचा दि.14 ऑगस्ट रोजीच्या आदेशान्वये सर्व दुकाने, सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
उपहारगृहे यांना 50 टक्के शमतेने परवानगी देण्यात आलेली आहे. खुले मंगल कार्यालय यांना जास्तीत जास्त 200 व्यक्ती व बंदिस्त मंगल कार्यालय जास्तीच्या 100 व्यक्ती कार्यासाठी उपस्थित राहतील.
धार्मिक स्थळे व सिनेमा हॉल बंद राहतील.
मंगळवेढा शहरामद्ये होणारी गर्दी व कोरोना रुग्णाची संख्या मध्ये वाढ होणे नाकारता येणार नाही. आपणाला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर वाढलेली रूग्ण संख्या आपण सर्वांनी पाळलेल्या जनता कर्फ्यु मुळे व नियमांचे पालन केल्याने शक्य झाले आहे. यामुळे आपल्या तालुक्याचे नाव सर्व दुकाने चालू राहतील यामध्ये आले आहे.
सर्व नागरिकांनी व व्यावसायिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. रुग्ण संख्या वाढणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. दुकान मालक व दुकानातील कामगार यांनी लसचे दोन्ही डोस घ्यावेत आशा सूचना कर निरीक्षक विनायक साळुंखे तसेच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड व सचिव अरुण किल्लेदार यांनीही केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज