टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापुरात आषाढ महिन्यानिमित्त कर्णिक नगर येथे म्हशी पळवण्याच्या कार्यक्रम आयोजित करणे चांगलेच महागात पडले आहे. या कार्यक्रमातील दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यक्रमादरम्यान कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला होता. लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचेसुद्धा पालन केले नव्हते. याच कारणामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. जेलरोड पोलीस ठाण्यात यासंबंधी एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यक्रमामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.आषाढ महिन्यानिमित्त कर्णिक नगर येथे रस्त्यावर म्हशी पळवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक लोकांनी तोंडाला मास्क लावलेले नव्हते. तसेच लोकांनी सोशल डिस्टन्सिंगसद्धा पाळले नाही.
कार्यक्रमामध्ये झालेल्या या सर्व गर्दीचा व्हिडीओ नंतर समोर आला होता. हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी चिंता व्यक्त केली होती. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काही लोकांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनीसुद्धा या प्रकाराची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी कार्यक्रमादरम्यान गर्दीस कारण ठरलेल्या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले जात आहे. सध्या कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा काळात सर्वांनी नियम पाळणे गरजेचे आहे. नियमांची पायमल्ली होत असेल तर कोरोना पसरायला वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज