टीम मंगळवेढा टाईम्स ।
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज मंगळवेढा मुक्कामी येणार असून, २६ जुलैच्या रात्री ते परत जाणार आहेत. दोन दिवस त्यांचा मुक्काम आमदार समाधान आवताडे यांच्या फार्महाऊसवर असेल.
हा दौरा कौटुंबिक असून, आपल्या घरी सदिच्छा भेट देत असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
मंगळवेढा भेटीत आगामी सोलापूर महानगरपालिका, विधान परिषद, जिल्हा परिषद, नगरपालिका, दामाजी कारखाना निवडणुका पाहता राजकीय समीकरणावर चर्चेची शक्यता आहे.
शहरासह जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचाली
सोलापूर महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी प्रदेश काँग्रेसकडून सुरू आहे.
त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल, कार्याध्यक्ष बसवराज पाटील, उपाध्यक्ष मोहन जोशी शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी अध्यक्ष बदलण्याबाबत धोरणात्मक निर्णयाची शक्यता आहे.
जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील भेटत नसल्याच्या तक्रारी स्थानिक पदाधिकारी , कार्यकत्यांच्या आहेत. केवळ माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे वा ज्येष्ठ नेत्यांच्या दौऱ्यात जिल्हाध्यक्ष भेटतात अशा तक्रारी प्रदेश काँग्रेस कमिटीकडे गेल्या आहेत.
तसेच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही , प्रश्न सोडवले जात नाहीत अशीही तक्रार आहे.
यावरून जिल्हाध्यक्ष पाटील यांना बदलण्याची मागणी तालुकाध्यक्षांकडून सुरू आहे. शहराध्यक्ष वाले यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षांतर्गत धुसफूस सुरू आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज