टीम मंगळवेढा टाईम्स ।
दहावीचा ऑनलाइन निकाल अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. वर्ष 2021 च्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळालेले गुण ऑनलाइन निकालात उपलब्ध होतील.
सदर माहितीची विद्यार्थ्यांना प्रिंटआऊटदेखील घेता येईल.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वर्ष 2021 ची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याने अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार विद्यार्थ्यांचा निकाल हा इयत्ता नववीचा अंतिम निकाल,
दहावीच्या वर्षभरातील लेखी अंतर्गत मूल्यमापन, दहावीतील अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याआधारे विद्यार्थ्यांना शाळांमार्फत गुण देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
बैठक क्रमांक टाका, निकाल समजणार
ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक निकालाच्या वेबसाईट भरायचा आहे.
यंदा परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना हॉल तिकीटही देण्यात आली नसल्याने काही विद्यार्थ्यांना त्यांचा बैठक क्रमांक माहिती नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी www.mahahsscboard.in या वेबसाईटवर बैठक क्रमांक मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.
परीक्षेचा बैठक क्रमांक आणि आईचे नाव वेबसाईटवर भरल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येईल.
निकाल पाहण्यासाठी वेबसाईट
http://result.mh-ssc.ac.in
www.mahahsscboard.in
कोरोनामुळे दहावीची लेखी परीक्षाच न झाल्याने श्रेणीसुधार योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही.
या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेचा समावेश करण्यात येणार नसून या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेअंतर्गत पुढील एक, दोन परीक्षेच्या संधी दिल्या जाणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज