टीम मंगळवेढा टाईम्स ।
हॉटेलमधील टेबलवर उलटी केल्याने समजावून सांगत तुम्ही आम्हाला सांगणारे कोण असे म्हणून हॉटेल चालक संदिप सिध्देश्वर मोहिते (वय ३६) यांना शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी करून ढाबा जाळून जीवे जेवण मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी परमेश्वर तुकाराम लुगडे , सचिन ज्ञानेश्वर लुगडे , विजय भाऊसो गाडवे व एक अज्ञात इसम (सर्व रा.पाटखळ ) या चौघावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील फिर्यादी तथा जखमी संदिप सिध्देश्वर मोहिते (मूळ रा . माचणूर) यांचे पंढरपूर मार्गावर सिध्देश्वर नावाचे हॉटेल असून दि १० रोजी सायंकाळी ४.०० च्या दरम्यान यातील वरील आरोपी यांनी तसेच जेवण करून जात असताना दिल्याचे काऊंटरजवळ त्यामधील एकाने जेवणाच्या टेबलवर उलटी केली.
यावेळी फिर्यादी उलटी बाहेर करायची असते असे समजावून सांगत असताना तुम्ही आम्हाला कोण सांगणार असे म्हणून वरील चौघा आरोपीनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच हॉटेलच्या बाहेरील दगड हातात घेवून काऊंटरजवळ येवून फिर्यादीच्या उजव्या मारून गंभीर जखमी केले.
व जाताना तुझा ढाबा जाळून टाकेन तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास पोलिस नाईक सुहास देशमुख हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज