टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करीत विषाणूचा प्रादुर्भाव वाढीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ४० जणांविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत.
इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तरीही केंद्र सरकारकडून त्यावर उपाय शोधला जात नाही. महागाई वाढत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शांती चौक , गणेश पेठ , विजयपूर रोड , कुंभार वेस येथील पंपासमोर आंदोलने केली.
त्यावेळी जोडभावी पेठ पोलिस , विजापूर नाका आणि जेलरोड पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत .
त्यात काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले , उदयशंकर चाकोते , भारती उप्पलपल्ली , नागनाथ भोसले , पशुपती माशाळ , रितेश भोसले , प्रवीण शिवशरण , अभिषेक जाधव , विश्वास बोबे , श्रीनिवास इंदापुरे , अक्षय कोळेकर , आनंद खटके , अरूण साठे , माजी महापौर अलका राठोड , भोजराज पवार , सुनिता होटकर , यश बुधवतराव , जावेद शेख , मंगेश डोके .
समद सैय्यद , रोहित कोळेकर , रोहन साठे , राहूल मट्टे , सुष्मित क्षिरसागर , ऋषिकेश राठोड , राकेश मनथेन , लालप्पा साने , सत्यनारायण संगा , माजी नगरसेवक अशोक कलशेट्टी , दत्तु बंदपट्टे , हारून शेख , शोएब कडीचूर , बाबा बाबरे , चलवादी सर , तौफिक हत्तुरे , मोनिका सरकार , संजय गायकवाड , लक्ष्मीकांत साका , जुबेर कुरेशी यांचा समावेश आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज