टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात दररोज कोरोना रुग्णांची झपाट्याने संख्या वाढत आहे ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत त्यांच्यावर मंगळवेढा येथील कोव्हिडं केअर सेंटर येथे उपचार होत आहेत परंतु ज्यांची लक्षणे तीव्र स्वरूपात असतात ज्यांना श्वसनाचा त्रास होतो अशा रुग्णांचे मात्र हाल होत आहेत प्रसंगी जीवही गमवावा लागू नये यासाठी मंगळवेढा येथे अत्याधुनिक कोव्हिडं हॉस्पिटल उभारावे अशी मागणी होत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील एका 40 वर्षीत व्यक्तीला त्रास होऊ लागल्यामुळे मंगळवेढा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी त्यांना सोलापूर येथे उपचाराला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. परंतु बराच वेळ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे संबंधित व्यक्तीला खासगी वाहनाने उपचारासाठी सोलापूरला नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तालुक्यात आरोग्य व्यवस्था कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने मंगळवेढा येथील दोन हॉस्पिटलचे कोव्हिडं हॉस्पिटल म्हणून हस्तांतरण केले आहे.मात्र तेथे चार महिने होत आले तरी अद्याप उपचार सुरू न झाल्याने श्वसनाचा व इतर त्रास असणाऱ्या रुग्णाची उपचाराअभावी तडफड सुरू आहे.
त्यामुळे मंगळवेढा येथे उपचारासाठी परवानगी दिलेल्या कोव्हिडं हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू करून रुग्णांचा जीव वाचवावा करावी अशी मागणी होत आहे.
पाहिजेत
मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होणाऱ्या मेडिकल स्टोअरसाठी बी’ किंव्हा ‘डी’ फार्मसी झालेल्या अनुभवी मुला मुलींची अर्जंट भरती होणार आहे. संपर्क : 7322020202
आजपर्यंत तब्बल 14 जण कोरोनाने मृत्युमुखी पडले असून आणखी किती बळी गेल्यानंतर कोव्हिडं हॉस्पिटल सुरू होणार असा संतापजनक सवाल केला जात आहे.मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात कोरोना चाचणी प्रमाण वाढल्याने परिणामी रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
सध्या गावोगावी रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू केल्या आहेत त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत आहे दरदिवशी दोन अंकी संख्येत पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहेत. ज्या रुग्णांना सौम्य लक्षण आहेत त्यांना वीरशैव येथील कोव्हिडं केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहेत.
मात्र येथील सोयीसुविधा बाबत जनतेतून कायमच ओरड ऐकावयास मिळत आहे.रुग्ण कोव्हिडं सेंटर मधून निगेटिव्ह म्हणून बाहेर पडल्यानंतर तेथिल एकूण चित्र मांडतो. ते ऐकुन तेथे आपल्याला जावे लागू नये असे सर्वानाच वाटते. शहरातील रुक्मिणी माता कोव्हिडं केअर सेंटर मध्ये सहा ऑक्सिजन यंत्रे बसवण्यात आली आहेत मात्र रोजची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पाहता उपाययोजना तोकडी पडत असल्याच्या प्रतिक्रिया रुग्णांमधून व्यक्त होत आहेत.
अनेक वयस्कर रुग्ण आढळत आहेत त्यांना श्वसनाच्या त्रासाबरोबर इतर आजारही असल्याने अशा रुग्णाची मंगळवेढा येथे अत्याधुनिक सुविधा अभावी गैरसोय होत आहे.सोलापूर ला जावे तर तेथे बेड मिळत नाहीत.
मंगळवेढा येथे रुग्णाची सोय व्हावी यासाठी दोन सुसज्ज हॉस्पिटल कोव्हिडं हॉस्पिटल म्हणून जाहीर केली आहेत मात्र येथे कोव्हिडं रुग्णांवर उपचार सुरू नाहीत. या दोन हॉस्पिटलप्रमाणे शहरातील महात्मा फुले योजनेत समावेश आसलेल्या दामाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही कोव्हिडं उपचार सुरू झाल्यास रुग्णांची हेळसांड थांबेल. या हॉस्पिटल शिवाय शहरात जी सुसज्ज हॉस्पिटल जिल्हा प्रशासनाने कोरोना महामारीच्या काळात हस्तांतरित करून घेण्याची गरज आहे.
आज सोलापूर शहरात बेड उपलब्ध व्हावा यासाठी अनेकजण हातापाया पडत आहेत तरीही वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत गत आठवड्यात मंगळवेढा येथिल दोन नामांकित डॉक्टरांना सोलापूर येथील उपचारासाठी बेड मिळावा यासाठी किती तरी वेळ वाट पहावी लागली डॉक्टरांची ही अवस्था असेल सर्वसामान्यांची अवस्था काय असेल हे विदारक वास्तव समोर आले आहे.
केवळ अत्याधुनिक कोव्हिडं हॉस्पिटल नसल्याने जर मंगळवेढ्यातील रुग्णांना जीव गमवावा लागत असेल तर हे योग्य नाही. त्यामुळे या विषयाकडे लोकप्रतिनिधिसह तालुक्यातील सर्व नेतेमंडळीनी गंभीरपणे पाहून लवकरात लवकर अत्याधुनिक कोव्हिडं हॉस्पिटल निर्मिती करावी अशी मागणी होत आहे.
मंगळवेढा येथील ही दोन हॉस्पिटल कोव्हीड हॉस्पिटल म्हणून जिल्हा प्रशासनाने हस्तांतरण केले आहेत मात्र अद्याप उपचार सुरू नाहीत . शहरातील रुक्मिणी माता कोव्हीड केअर सेंटर मध्ये सहा ऑक्सिजन यंत्रे बसवण्यात आली आहेत.- स्वप्निल रावडे,तहसीलदार मंगळवेढा
मंगळवेढा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आजपर्यंत 14 जण मृत्युमुखी पडले आहेत.अशा स्थितीत शहरात अत्याधुनिक कोव्हीड हॉस्पिटलची गरज आहे.अनेकांना सोलापूर येथे बेड उपलब्ध न झाल्याने तडफड सहन करावी लागत आहे.आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन हॉस्पिटल सुरू करणार आहे. तालुक्याला कोणी वाली नसल्याने मंगळवेढा तालुक्यातील रुग्णांची फरफट सुरू आहे.- धनाजी सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष बहुजन वंचित आघाडी
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज