टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीमेवर केंद्र आणि राज्य सरकारांकडून भर दिला जात आहे. मात्र लसीकरणानंतरही अनेकांना लक्षणं दिसून येत आहेत.
मात्र, कोरोना लसीकरण झालेल्या नागरिकांना कोरोना झाला तरी त्यांना धोका कमी राहतो. असं असलं तरी सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे.
दरम्यान, तुम्ही लस घेतली असूनही तुम्हाला आम्ही सांगत असलेली चार लक्षणं दिसून येत असतील तर कदाचित तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असू शकता.
लसीकरणानंतर तुम्हाला ही लक्षणं जाणवत आहेत?
कोरोनाची लस टोचल्याच्या काही वेळानंतर तुम्हीला सातत्याने शिंका येत असतील तर सावध व्हा. कारण, असं असेल तर तुमच्या अॅन्टीबॉडीज कमी प्रमाणात कार्यरत असल्याचं लक्षण आहे.
अशावेळी तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकता. त्यामुळे सातत्याने शिंका येत असतील तर कोरोना चाचणी करुन घ्या आणि सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन योग्य ती खबरदारी घ्या.
तज्ज्ञांच्या मते तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा छाती जड झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्हाला कोरोनाची लागण झालेली असू शकते. त्याचबरोबर छातीमध्ये कफ मोठ्या प्रमाणात जमा होत असेल तर तुम्ही कोरोना चाचणी करुन घेणं योग्य ठरेल.
10 टक्के लोक कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. कारण, कोरोना लस ही कोरोनापासून 100 टक्के बचावाचा दावा करत नाही.
त्याचबरोबर तुम्हाला कानाच्या आत दुखत असेल आणि थंडी वाजून येत असेल तर कोरोना चाचणी अवश्य करा. हे कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोना होण्याचं लक्षण असू शकतं. याबाबत ब्रिटिश सायन्स जर्नलमध्ये अहवालही छापून आला आहे.
तुमच्या गळ्याभोवती सूज जाणवत असेल तर त्या ठिकाणी दुखत असेल तर हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असण्याचं लक्षण असू शकतं. ब्रिटनमध्ये जवळपास 60 लाख लोकांवर लक्ष केंद्रीत केल्यानंतर वैज्ञानिक या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत.
चीनच्या वुहानमध्येच कोरोना विषाणू तयार!
कोरोना विषाणू ही चीनने जगाला दिलेलं सर्वात मोठं संकट असल्याचं अनेकदा बोललं जातं. मात्र, त्याबाबत आता अधिकृत दावा केला जातोय.
चीनच्या वैज्ञानिकांनी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी मध्ये कोरोना विषाणू तयार केलाय. एका नव्या अभ्यासात हा खळबळजनक दावा करण्यात आलाय. चिनी वैज्ञानिकांनी विषाणू तयार केल्यानंतर त्याला रिव्हर्स-इंजीनिअरिंग व्हर्जनमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला.
जेणेकरुन हा विषाणू वटवाघळापासून आल्याचं जगाचा समज होईल. मात्र, संपूर्ण जगातील मीडियामध्ये हा विषाणू वुहानच्या लॅबमध्येच निर्माण झाल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत.(स्रोत:tv9मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज