mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागेश हेगडेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यावर मनुष्यवधाचा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; होलार समाज संघटनेची मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 27, 2021
in मंगळवेढा
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथील मयत नागेश नाथा हेगडे याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा व ॲट्रॉसिटी  गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी आज मंगळवेढा येथील पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली.

यावेळी राज्य संघटक प्राचार्य मधुकर भंडगे, संघटनेचे नेते हैदर केंगार, सामाजिक कार्यकर्ते संजय गेजगे,संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवाजी केंगार, मुलाचे वडील नाथाजी हेगडे, आप्पासो हेगडे हे उपस्थित होते.
या निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, तालुक्याचे आमदार समाधान आवताडे, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिकारी अतुल झेंडे याना मेलद्वारे निवेदन पाठवलेले आहे.

सदर घटनेचे सविस्तर वृत्त असे की, नंदुर तालुका मंगळवेढा येथील नाथा हेगडे होलार समाजातील एक गरीब कुटुंब असून ऊसतोडणी व मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा ओढित आहेत.

मंगळवेढा पोलीस खात्याच्या कारवाईत टार्गेट ठरविलेले हेगडे कुटुंब अडचणीत सापडले असून,अवैध धंद्याशी कोणताही संबंध नसताना मयत नागेश नाथा हेगडे याचा पोलीस खात्याकडून करण्यात आलेल्या कारवाईत नाहक बाळी गेला.याला पूर्णतः पोलीस प्रशासन जबाबदार आहे.

त्यामुळे हे कुटुंब आज उघड्यावर आहे,वीस वर्षाची पत्नी विधवा झाली,सव्वा वर्षाचा मुलगा पोरखा झाला. सदर घटनेबाबत पोलीस खात्याकडे न्याय मागत असताना अधिकाराचा दुरुपयोग करीत पोलिसांकडून या कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय,शिवाय सर्व पुरावे आपल्या बाजूने होण्यासाठी पोलीस यंत्रणा कटाक्षाने प्रयत्नशील आहेत.

मंगळवेढा पोलीस खात्याच्या दहशतीमुळे सतत केलेल्या कारवाईमुळे हेगडे कुटुंबावर मोठे संकट असून एका मुलाचा बळी गेला  असतानाही सतत आजारी असणाऱ्या मातेवर दारू विक्रीचा गुन्हा दाखल करून पोलीस खात्यानी अकलेची तारे तोडण्याचा प्रयत्न केला आहे.

पोलिसांच्या दहशतीमुळे मयत नागेश हेगडे याचा बळी गेला हे पोलीस खात्याला ज्ञात असूनही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून अधिकाराचा दुरुपयोग करीत या कुटुंबावर अन्याय केला जातोय.यासाठी अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने हेगडे कुटुंबावर होत असलेल्या अन्याया विरोधात  आवाज उठवित आहोत.

नागेश नाथा हेगडे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले पोलीस व कर्मचारी मोकाट आहेत. तपास अधिकारी  यांनी  हेगडे कुटुंबाला निपक्षपाती पणे न्याय द्यावा व त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आज होलार समाज संघटनेकडून करण्यात आली  आहे.

जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिकारी अतुल झेंडे यांनी हेगडे कुटुंब नातेवाईकांना दोन दिवसात मयत नागेश हेगडे याच्या मयतास जबाबदार असलेल्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी लेखी हमी देवून ही आज सात दिवस ओलांडुनी ही कारवाई झाली नाही.

तरी प्रशासनाने हेगडे कुटुंबाला न्याय द्यावा अन्यथा लॉक डाऊन संपताच समस्त होलार  समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा आज देण्यात आलेल्या निवेदनात होलार समाजाने दिला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पोलीस स्टेशन

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
Next Post
मंगळवेढयातील जप्त १६१.८८ ब्रास वाळू साठ्याचा जाहीर लिलाव

सोलापुरातील वाळू लिलावात ठेकेदारांना 'नो' इंटरेस्ट, एकाचाही नाही सहभाग; पर्यावरण समितीकडे पुन्हा प्रस्ताव

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..