टीम मंगळवेढा टाईम्स । पतीबरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पत्नीने अन्य दोन मुलासह आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विहिरीत उडी टाकल्याने यामध्ये जिजा उर्फ पिलू ही पाण्यात बुडून मयत झाल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील धर्मगाव येथे घडली असून या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मयत अशी नोंद केली आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील खबर देणारी पारूबाई संतराम गोडसे (रा.धर्मगाव) हिची सून सोनाली हिने दि . ७ च्या रात्री व सोमवारी सकाळी ९ च्या दरम्यान मुलगा सिध्देश्वर याच्याशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने,
खबर देणाऱ्या यांच्या शेतातील विहिरीमध्ये नातू कृष्णा , नात जिजा उर्फ पिलू यांच्यासह उडी टाकल्याने नात जिजा उर्फ पिलू हिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे.
घटनेचे नेमके कारण स्पष्ट न झाल्यामुळे पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.अधिक तपास पोलिस नाईक सुरवसे करीत आहेत.
पाहिजेत
मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होणाऱ्या मेडिकल स्टोअरसाठी बी’ किंव्हा ‘डी’ फार्मसी झालेल्या अनुभवी मुला मुलींची अर्जंट भरती होणार आहे. संपर्क : 7322020202
Mangalwedha dharmgav The wife jumped into the well with her two children, keeping in mind the anger of the quarrel with her husband
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज