mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ज्या नावाचे बार नाही त्या नावाच्या बिअर बारमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 17 जणांविरुद्ध गुन्हा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
ज्या नावाचे बार नाही त्या नावाच्या बिअर बारमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 17 जणांविरुद्ध गुन्हा

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील रविकिरण बिअर बारच्या पाठीमागे खुल्या जागेत पैसे लावून मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या 17 जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवून तब्बल 2 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक ग्रामीणच्या विशेष पथकाने केली असली तरी कारवाईतील बिअर बार मात्र मंगळवेढ्यात नसल्याने कारवाईबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

या घटनेची हकिकत अशी,की पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून रविकिरण बिअर बारच्या पाठीमागील खुल्या जागेत काही जुगारी पैज लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.

यावरून तेथे छापा टाकला असता यातील आरोपी विक्रम श्‍यामराव शेंबडे (वय 34), संजय सुरेश मोरे (वय 42), संदेश सिद्धेश्‍वर काळुंगे (वय 29), अमोल कृष्णा मुदगूल (वय 29), योगेश यल्लाप्पा कट्टे (वय 49), संदीप हरी पडवळे (वय 34), विजय जयवंत कट्टे-पाटील (वय 53), ज्ञानेश्‍वर श्‍यामराव इंगळे (वय 35), 

पाहिजेत


मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होणाऱ्या मेडिकल स्टोअरसाठी बी’ किंव्हा ‘डी’ फार्मसी झालेल्या अनुभवी मुला मुलींची अर्जंट भरती होणार आहे. संपर्क : 7322020202

बालाजी अशोक इंगळे (वय 30), सचिन भाऊ चेळेकर (वय 34), नागराज आडव्याप्पा होनमोरे (वय 40), सागर शिवाजी डांगे (वय 21), निखिल बाळासाहेब कोळी (वय 24), अनिल सिद्धेश्‍वर डांगे (वय 40), गणेश शिवाजी निचळ (वय 25), बाळू भीमाशंकर बुधवंतराव (वय 55, सर्वजण रा. मंगळवेढा), मधुकर ज्ञानदेव शिंदे (वय 36, रा. डोंगरगाव) आदी गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळताना पथकाला मिळून आले.

या वेळी पोलिसांनी रोख रक्कम, पाच मोटारसायकली असा एकूण दोन लाख 85 हजार 490 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

मंगळवेढा शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. अशा परिस्थितीत जुगार व इतर अवैध धंदे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांतून केल्या जात आहेत.

पाठकळमध्ये केलेल्या कारवाईत जप्त केलेली रक्कम व कारवाईत दाखवलेली रक्कम यात तफावत झाल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी या प्रकाराकडे किती गांभीर्याने घेतात, याकडे लक्ष लागले आहे.शहरामध्ये दहापेक्षा अधिक जुगाराचे अड्डे सुरू असून यातून पोलिस खात्याला आर्थिक रक्कम मिळत असल्याची चर्चा कारवाईनंतर पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू झाली.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना एकत्र जमून जुगार खेळण्याचा सुगावा स्थानिक पोलिसांना न लागता जिल्हा पथकाला लागतो, याबाबत नागरिकांच्या उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. सध्या शासनाने नागरिकांनी कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी व्यक्तिगत पातळीवर सोपवल्याने व संचारबंदी नसल्याने पोलिसांची कुमक या कामातून मुक्त झाली आहे.जिल्हा पोलिस प्रशासनाने यावर योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra MazaMangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘ही’ बँक अनिश्‍चित काळासाठी बंद राहणार

मंगळवेढेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'ही' बँक अनिश्‍चित काळासाठी बंद राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा