mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ऐकीचे बळ! उजनी धरणातील पळविलेले पाच टीएमसी पाणी वाचविण्यासाठी ‘हा’ तालुका एकवटला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 16, 2021
in सोलापूर, राज्य

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील पळविलेले पाच टीएमसी पाणी वाचविण्यासाठी तसेच त्या संदर्भात निघालेला आदेश रद्द करावा यासाठी आता अंतर्गत मतभेद, पक्षभेद विसरून सर्वजण एकवटले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेला वेग आला आहे.

दरम्यान, या लढ्यात सहभागी होण्यासाठी तालुक्‍यातील अनगरसह अन्य 103 ग्रामपंचायतींनी हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती स्व.यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक नागेश वनकळसे यांनी दिली. त्यामुळे पालकमंत्री विरुद्ध शेतकरी असा मोठा संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सांडपाणी या गोंडस नावाखाली उचलण्याचा घाट घातला आहे.

वास्तविक, उजनीतील सर्व पाण्याचे यापूर्वीच योग्य वाटप झाल्याचे पाटबंधारे अधिकारी तसेच पाणी प्रश्नावर काम करणारे तज्ज्ञ सांगत आहेत. तसे पुरावेही आहेत. जिल्ह्यातील उजनीवर अवलंबून असलेल्या अनेक उपसा सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना अपुऱ्या आहेत.

त्यात मोहोळ तालुक्‍यातील आष्टी, शिरापूर उपसा सिंचन, पोखरापूर टप्पा क्रमांक दोन यासह अनेक योजनांची कामे निधीअभावी रखडली आहेत.

सध्या सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. उजनी हे जिल्ह्याची वरदायिनी असून या धरणातील पाण्यावर केवळ सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्क आहे. उजनीतील पाण्यावर अनेकांचे प्रपंच व अर्थकारण अवलंबून आहे.

असे असताना, पालकमंत्री भरणे यांनी उजनीतील पाच टीएमसी पाणी नेण्याचा घाट घातला आहे. याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुतरामही कल्पना दिली नाही, तर या कानाची माहिती त्या कानालाही कळू दिली नाही. दरम्यान, हे पाच टीएमसी पाणी उचलले तर शेतकरी देशोधडीला लागणार आहे.

अगोदरच आठमाही असलेल्या धरणातून हे पाच टीएमसी पाणी गेले तर पुन्हा पाणी मिळेल की नाही याची शाश्वती नाही. या पाच टीएमसी पाण्यासाठी गेला महिनाभर विविध शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत, तर जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे भीमानगर येथील उजनीच्या गेटसमोर कार्यकर्त्यांसह आंदोलन सुरू आहे.

याबाबत मार्ग काढण्यासाठी पुणे येथे एका बैठकीचा फार्स करण्यात आला. दरम्यान, निमंत्रक नागेश वनकळसे यांनी याबाबत न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली असून, तालुक्‍यातील 104 ग्रामपंचायती या लढ्यात सक्रिय सहभागी होत आहेत.

या लढ्याची सुरवातच मोहोळ तालुक्‍याचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर ग्रामपंचायतीपासून सुरू झाल्याने इतर ग्रामपंचायतींना तसेच त्यांच्या सरपंच व इतर कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ मिळाले आहे. त्यामुळे उजनीतील पाच टीएमसी पाणी नेण्याचा आदेश रद्द न झाल्यास मात्र पालकमंत्री विरुद्ध शेतकरी असा उघड संघर्ष होणार आहे.(सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पालकमंत्री दत्तात्रय भरणे

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
Next Post
नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यात आजपासून विना मास्कचे फिरताना आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

मंगळवेढ्यातील कोरोनाबाधित रुग्णांना आता मिळणार सर्व प्रकारची मदत; मदतकार्य समितीची स्थापना, हेल्पलाईन नंबर जारी

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा