mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील आई-बाबा गमावलेले अनाथ बालके शोधा; जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना, हेल्पलाईन क्रमांक केला जारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 15, 2021
in सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार राहणार बंद

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोविड संसर्गामुळे पालक गमावलेली बालके शोषणास बळी पडू नयेत अथवा गुन्हेगारी कारवायांत ओढली जाऊ नयेत याची दक्षता राज्य शासनातर्फे घेतली जात आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये सोलापूर जिल्ह्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी निवासस्थानी असलेल्या कार्यालयात झाली. त्या बैठकीत श्री. शंभरकर यांनी सूचना दिल्या.

सोलापूर जिल्ह्यात कोविड-19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेली मुले आहेत का, असल्यास कोणत्या तालुक्यात आहेत याची वस्तुस्थिती व सत्यता पडताळून घेण्याचे निर्देश श्री. शंभरकर यांनी दिले.

याबाबत सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी व मनपा उपायुक्त, ग्रामीण भागासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी अनाथ बालके असल्यास त्याबाबतची माहिती टास्क फोर्सला सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.

सोलापूर जिल्ह्यातील बालग्रहातील सर्व कर्मचारी यांचे लसीकरण करावे, बालकांची विशेष काळजी घ्यावी, निरीक्षणग्रहांना आवश्यक असणारा निधी वेळेत उपलब्ध करुन द्यावा, अशा सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.

बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. शशिकांत मोकाशी, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले,  महिला व बालविकास अधिकारी विजय खोमणे, अनुजा कुलकर्णी,  महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी उपस्थित होते.

बालकांच्या समस्यांबाबत संपर्क क्रमांक

चाईल्ड हेल्पलाइन 1098, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, नियंत्रण कक्ष ०२१७- २७३२०००, २७३२०१०, अनुजा कुलकर्णी, अध्यक्ष बालकल्याण समिती ९४२३३३०४०१, विजय खोमणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ८६०५४५३७९३, आनंद ढेपे ९८८१४९०२२६, दीपक धायगुडे ७३८७२६७९२२, जयाप्रदा शरणार्थी ७९७२५५०४२३, ,शोभा शेंडगे ९६८९९५८६४५

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

November 16, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! हॉटेल मालकाने मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाइपने मारहाण केल्याने गुन्हा; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

November 16, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! पत्नीचा साडीने गळा आवळून केला खून, स्वतःही गळफास घेऊन केली आत्महत्या; नेमके कारण काय?

November 16, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळजनक! ग्रामसेवकाच्या सहीचे बोगस कागदपत्र बनवून बँकेची ५३ लाखांची फसवणूक; बँक व्यवस्थापकासह २० जणांवर गुन्हा दाखल

November 14, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! आईकडून सततचा दुजाभाव, माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा; तरुण वकिलाने चिठ्ठी लिहित संपवलं जीवन, सोलापुरात खळबळ

November 14, 2025
मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 करा संपर्क; आजच करा अर्ज

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘शांतीसागर इंण्डेन गॅस एजन्सी’मध्ये नोकरीची संधी, थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार; गॅस असणाऱ्यांनी केवायसी करा, अन्यथा सबसिडी मिळणार नाही; ‘ही’ आहे शेवटची तारीख

November 14, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

वडिलांना घराचा ताबा देऊन मुलांनी घर रिकामे करावे, वडिलोपार्जित जमिनीत उत्पन्नापैकी ५० टक्के वार्षिक हिस्सा वडिलांना द्या; आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

November 14, 2025
मोठी बातमी! नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ तीन जणांनी केली उमेदवारीची मागणी; मुलाखतीसाठी हजर असणाऱ्यांनाच मिळणार तिकिट

मोठी बातमी! नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ तीन जणांनी केली उमेदवारीची मागणी; मुलाखतीसाठी हजर असणाऱ्यांनाच मिळणार तिकिट

November 11, 2025
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

धक्कादायक! मुलाच्या अपघाती मृत्यूने खचलेल्या वृद्ध माता-पित्याने मृत्यूला कवटाळले; ‘या’ गावातील घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हळहळ

November 11, 2025
Next Post
खळबळ! वाहने अडवून पैसे वसूल करणारा मंगळवेढ्यातील तोतया पोलीस ताब्यात

ग्रामीण भागातून सोलापूर शहरात येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र बंधनकारक

ताज्या बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! अर्ज छाननीमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या हरकतीवर निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर सुनावणी पूर्ण; निकाल ठेवला राखून; निर्णय देण्यासाठी विलंब होत असल्यामुळे शहरांमध्ये विविध चर्चेला उधाण?

November 18, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो कामाची बातमी! लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा ई केवायसी

November 18, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची संभाव्य तारीख समोर; वाचा कसा असेल प्रोग्राम

November 18, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्यात नगराध्यक्षपदासाठी १९ तर नगरसेवकपदासाठी तब्बल ‘एवढ्या’ उमेदवारांनी मोठी ताकद दाखवत उमेदवारी अर्ज केले दाखल; आज छाननी; अनेकांच्या हरकती येणार

November 18, 2025
मोठा ट्विस्ट! सुप्रिया जगताप यांना भाजपची उमेदवारी, तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत भरला अपक्ष अर्ज, समविचारी कडून सुनंदा आवताडे; तर माजी सभापती यांना उमेदवारी

मोठा ट्विस्ट! सुप्रिया जगताप यांना भाजपची उमेदवारी, तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत भरला अपक्ष अर्ज, समविचारी कडून सुनंदा आवताडे; तर माजी सभापती यांना उमेदवारी

November 17, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

दुर्दैवी घटना! लेकीसोबत अखेरची भेटही होऊ शकली नाही; मुलीच्या घरी जाताना वाटेत मृत्यू आडवा आला, मंगळवेढा हळहळलं

November 17, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा