mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘या’ ठिकाणी होणार 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना कोरोना लसीकरण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 8, 2021
in सोलापूर
कोरोना लसीचा डोस घेतल्यावर ‘हे’ पिता येणार नाही?.वाचा सविस्तर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोनाच्या लढाईत मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स यासोबतच आता कोरोना लसीचेही महत्त्व सर्वसामान्यांना पटले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना लसीकरणासाठी सोलापूर जिल्ह्याला 12 हजार डोस प्राप्त झाले आहेत. त्यातील 3 हजार डोस महापालिका हद्दीसाठी तर नऊ हजार डोस ग्रामीण भागासाठी आहेत.

आजपासून पुढील पाच दिवस ऑनलाइन पद्धतीने नोंदणीद्वारे अपॉइंटमेंट घेऊन 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू होणार आहे.

नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचेच लसीकरण होणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनची सोय नसल्याने ज्यांनी बुकिंग केले आहे त्यांनी निवडलेल्या सत्रात वेळेत उपस्थित राहून लसीकरणाचा लाभ घ्यावा.

यामध्ये 45 वर्षांवरील लाभार्थ्यांना लसीकरण होणार नसल्याची माहितीही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

8 ते 12 मे या पाच दिवसांमध्ये सोलापूरच्या ग्रामीण भागात नऊ हजार जणांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.

मंगळवेढा तालुक्‍यातील मरवडे व बोराळे प्राथमिक आरोग्य केंद्र,अक्कलकोट तालुक्‍यामध्ये जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, बार्शी तालुक्‍यातील वैराग येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, करमाळा तालुक्‍यातील कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्र,

सांगोला तालुक्‍यातील अकोला प्राथमिक आरोग्य केंद्र, पंढरपूर तालुक्‍यातील कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, माढा तालुक्‍यातील कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालय, मोहोळमधील ग्रामीण रुग्णालय, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज ग्रामीण रुग्णालय व

नातेपुते ग्रामीण रुग्णालय अशा दहा ठिकाणी 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. 8 ते 12 मे या कालावधीत या दहा ठिकाणी दररोज अठराशे जणांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.

नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लस दिली जाणार

लसीकरणासाठी लाभार्थ्यांनी कुठल्याही प्रकारची गर्दी गोंधळ करू नये. ज्या सत्रात नोंदणी केली आहे त्याच सत्रात लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. कोरोना नियमाचे पालन करून शांततेत व शिस्तीत नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा. – दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना लससोलापूर जिल्हा

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! शेतीचा वाद ठरला काळ; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा आणि संपवलं आयुष्य

March 8, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

March 8, 2026
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूर विमानतळाचा फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचा मार्ग मोकळा; विद्यार्थ्यांचे पायलट होण्याचे स्वप्न होणार साकार

March 7, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! सात हजारांची लाच स्वीकारताना चालकाला रंगेहाथ पकडले; मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीतच पैसे घेतले

March 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
Next Post
चोरांची नवी शक्कल मंगळवेढ्यात धाडसी चोरी! पंपावरून 1 लाख 24 हजार रुपये किमतीच्या डिझेलची चोरी

सोलापूर ब्रेकिंग! मासे घेऊन जाणार ट्रक झाला पलटी; लोकांनी पिशव्या भरून मासे पकडले

ताज्या बातम्या

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मुख्यमंत्र्यांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री; आता थेट उपमुख्यमंत्री होणार, राजकीय चर्चांना उधाण

March 9, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 9, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण; कमवा आणि शिका योजनेतून ‘एवढे’ रुपये मिळणार; सरकारची घोषण

March 9, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! शेतीचा वाद ठरला काळ; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा आणि संपवलं आयुष्य

March 8, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..