टीम मंगळवेढा टाईम्स ।
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे आज मंगळवेढा येथे भारतीय जनता पक्षा तर्फे राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणावर काल सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द म्हणून निर्णय दिला. या निर्णयामुळे मराठा समाजाची भावना दुखावली गेली आहे.
या निर्णयाचे भारतीय जनता पक्षाने निषेध नोंदवला असून राज्य महा विकास आघाडी सरकार समाजाला न्याय देण्यास कमी पडल्याचे मत भाजपचे आहे.
राज्य सरकारला मराठा समाजाची सद्यस्थिती माहीत असून सरकारी वकिलांना समाजाची बाजू व्यवस्थित मांडता अली नसल्याचे देखील म्हणले जात आहे.
महाविकास आघाडी सरकार हे फक्त वसुली सरकार असून त्यांना मराठा समाजाशी कोणतेच देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहेत. आधी मराठा समाजाला काढलेली सारथी नावाची संस्था देखील बंद करण्याचे काम सरकारने केले नंतर आंदोलन केले पण संस्था चालू करून निधी कमी करण्याचे काम सरकारने केले.
राज्यात मराठा समाजाला न्याय भारतीय जनता पक्षाने दिला होता परंतु ह्या सरकारने त्यावर पाणी टाकण्याचे काम केले असे आरोप भाजप तर्फे केले आहेत.
मंगळवेढा शहरातील दामाजी चौक येथे ठिय्या मांडून निषेध आंदोलन करम्यात आले , यावेळी ठाकरे सरकार निष्क्रिय सरकार , राज्य सरकार चा निषेध , एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा देऊन निर्णयाचा निषेध करण्यात आला.
तसेच लावकरात लवकर तत्काळ अधिवेशन बोलवून समिती स्थापन करून समाजाला न्याय देण्याचा काम राज्य सरकारने कराव असे निवेदन पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
या आंदोलनात भाजपचे विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक , विधानसभा आमदार समाधान आवताडे , जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर , तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल , शहराध्यक्ष गोपाळ भगरे , बाजार समिती सभावती सोमनाथ आवताडे ,येताळा भगत , राजेंद्र सुरवसे , नागेश डोंगरे , सुदर्शन यादव ,युवा मोर्चा अध्यक्ष सुशांत हजारे , द्यानेश्वर कोंडुभैरी , उमेश विभूते ,सूरज फुगारे आदीजन उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज