mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विठ्ठल कारखाना हडप करण्यासाठी अख्ख पवार कुटुंबिय आज प्रचार करत फिरतंय; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर सडकून टीका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 14, 2021
in मंगळवेढा, राजकारण, राज्य
विठ्ठल कारखाना हडप करण्यासाठी अख्ख पवार कुटुंबिय आज प्रचार करत फिरतंय; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर सडकून टीका

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शेतकऱ्यांची अस्मिता असलेला ‘विठ्ठल सहकारी साखर कारखाना’ हडप करायचा या उद्देशाने अख्ख पवार कुटुंबीय आज प्रचार करत फिरत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ.प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मरवडे, कात्राळ, कर्जाळ, कागस्ट,येड्राव,जित्ती, शिवणगी, आसबेवाडी, सलगर खु,हुलजंती येथील आयोजित सभेत ते बोलत होते.

याप्रसंगी आ.गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,मरवडे गावचे सरपंच नितिन घुले,माजी सरपंच रजाक मुजावर,बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणवर यांच्यासह गावातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.प्रवीण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, आजपर्यंत पवार कुटुंबीयांना राज्यातील अनेक साखर कारखाने हडप केलेले आहेत. त्यानंतर त्यांचा डोळा आता विठ्ठल साखर कारखान्यावरती असल्याने त्यांचे सर्व कुटुंबीय आज प्रचारासाठी मंगळवेढा-पंढरपूर या मतदारसंघात येत आहे.

बळीराजाकडे यांनी दुर्लक्ष केले. हातातोंडाशी आलेले पीक पाया गेल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे.,अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान पाहणी करण्यासाठी आम्ही आज गेलो होतो. प्रचारासाठी आलेल्या एकाही मंत्र्याने पाहणी करण्यासाठी जाण्याची तयारी दर्शवली नाही. ठाकरे सरकार मधील मंत्री फक्त निवडणूक अली की मते मागण्यासाठी फक्त येत आहेत.

महावसुली सरकार हे कोरोनाच्या नावावर नागरिकांना कामापासून वंचित ठेवत आहात, लॉकडाउन केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली नाही. कामगारांच्या खात्यावर 5 हजार रुपये देण्याची मागणी आम्ही केली होती पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. अशा ठाकरे सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचा दावा त्यांनी केला.

मंगळवेढा दुष्काळी तालुका म्हणून या भागाची ओळख आहे,ही ओळख आता पुसायचा वेळ आली आहे. मंगळवेढा विजयानंतर राज्यात भाजपचे सरकार येणार असून  समाधान आवताडे यांच्या माध्यमातून भाजप सरकार हे प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आ.गोपीचंद पडळकर बोलताना म्हणाले की,सरकार मधील मंत्री नुसते पोकळ आश्वासन देऊन जातात ते परत कधी येणार आहेत याची कुणाला माहिती नाही. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारच्या काळात अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत,

मराठा समाजाच्या जीवावर आजपर्यंत यांनी राजकारण केले पण त्यांनी आरक्षण दिले नाही.भाजप सरकारने दिलेले आरक्षण सुद्धा या ठाकरे सरकारने काढून घेतले हा कसला अन्याय मराठा समाजावर झाला आहे.

तरुणांचे भविष्य उज्वल करण्यासाठी भाजप सरकार हा एकमेव पर्याय आहे. समाधान आवताडे आमदार झाल्यानंतर या मतदारसंघाचा पूर्ण चेहरा बदलून जाणार आहे.शेतकरी, सर्वसामान्य लोकांसाठी समाधान आवताडे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

राष्ट्रवादी म्हणजे भूल भुलिया पार्टी असून त्यांनी राज्यातील जनतेची दिशाभूल केली आहे.मंगळवेढा व पंढरपूर तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही जबाबदारी घेतली आहे. शेतकरी देशोधडीला लागला असताना हे सरकार बिल्डर यांना सवलत देण्यात मग्न आहे. शेतकऱ्यांचे वीज पुरवठा खंडित केला त्यांचे बिल माफ केले नाही.

राज्याने अनेक संकटे पाहिजे आहेत.पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घर सोडून बाहेर येत नसतील तर जनतेने कुणाकडे मदत मागायची.

राष्ट्रवादी मध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काहीच किंमत नाही, त्यांना कधी आमदार खासदारकीसाठी उभे केले नाही,आमदारांचा मुलगाच आमदार होणार हीच याच पक्षाचे रीत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.

यावेळी धनगर समाजाचे नेते बापूसाहेब मेटकरी, सतीश शिंदे, राजेंद्र पोतदार, राजाराम कदम,राजाराम कालिबाग,श्रीकांत गणपाटील,पांडुरंग मासाळ, अमोल जाधव,महेश गायकवाड, सोमनाथ टोमके, गणेश पाटील, भारत मासाळ गुरुजी,दत्तात्रय बनसोडे,बजीरंग गायकवाड, आदीजन उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रवीण दरेकरविरोधी पक्षनेते

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
Next Post

शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे आता कुठे गेले; राजू शेट्टी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना सवाल

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..