mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे 35 गावचा प्रश्न प्रलंबित; योजनेस केंद्राकडून निधी उपलब्ध करून मार्गी लावणार : देवेंद्र फडणवीस

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 12, 2021
in मंगळवेढा, राज्य

टीम मंगळवेढा टाईम्स ।

गेल्या अनेक वर्षांपासून मंगळवेढा तालुक्यातील 35 गावाचा पाणी प्रश्न प्रलंबित असून या उपसा सिंचन योजनेस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून केंद्र सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवेढा तालुक्यातील बोराळे,नंदेश्वर,डोंगरगाव व मंगळवेढा येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आले असता बोलत होते.

व्यासपीठावर खा.जयसिध्देश्वर महाराज,माढ्याचे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर,भाजप नेत्या चित्रा वाघ,आ.प्रशांत परिचारक,माजी सहकारमंत्री आ.सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,आ.गोपीचंद पडळकर,आ.सचिन कल्याणशेट्टी,धैर्यशील मोहिते पाटील,माजी मंत्री राम शिंदे, आ.राम सातपुते, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख,जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, प्रा.बी.पी.रोंगे,नामदेव जानकर,बालाजी भेगडे, आदीजन उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आजपर्यंत पाणी देतो म्हणून अनेक भूलथापा देऊन हे निवडून आले होते. पण पाणी काही मिळाले नाही.निवडणूक आली की कोणता तर बनावट कागद दाखवून फसवणूक करून मते मिळवली आहेत.

सामाजिक कार्याची आवड मेहनती संघर्ष करणारा नेता म्हणून समाधान आवताडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. आता दामाजीच्या मागे पांडुरंग उभा असल्याने समाधान आवताडे यांचा विजय निश्चित आहे.

गेल्या दिड वर्षात या सरकारचे नाव बदलून महा वसुली आघाडी नाव झाले आहे. जिथे जाऊ तिथे खाऊ अशी या सरकार मधील मंत्र्यांची कामे आहेत.

कोरोना काळात राज्यातील नागरिकांना एकाही रुपयांची मदत ठाकरे सरकारने केली नाही. जे मुख्यमंत्री बांधावर जाऊन सांगत होते हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळवून देऊ पण या सरकारने फक्त कवडीमोल मदत केली. सावकारी पध्द्तीने वीज बिलाची शेतकऱ्यांकडून वसुली केली.

लॉकडाउनच्या काळात जनतेच्या हाताला काम नव्हते त्यांना दुप्पट बिले देऊन आपली तिजोरी भरली,विजेची थकबाकीच्या नावाखाली यांनी शेतकऱ्यांची वीज कट केली त्यांची ट्रान्स्फर उचलून नेल्याचे पाप यांनी केले आहे.

मंगळवेढा-पंढरपूर येथील निवडणूक आहे म्हणून शेतकऱ्यांची वीज कट केली नाही 17 तारखेनंतर शेतकऱ्यांची वीज हे सरकार परत कट करणार असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा विजेचा सामना करावा लागणार आहे.

राज्याला 25 हजार कोटीचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक योजना मार्गी लागल्या आहेत.

मराठा समाजाला आम्ही दिलेले आरक्षण या सरकारने जाणूनबुजून काढून घेतले. या नालायक सरकारच्या गुणामुळे अनेकांचे आरक्षण यांनी रद्द केले आहेत. या भ्रष्टाचार बलात्कारी सरकारला जागा दाखवून दिली पाहिजे बोलून 17 तारखेला समाधान आवताडे यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

समाधान आवताडे बोलताना म्हणाले की,ही निवडणूक विधानसभेची निवडणूक आहे, पण विकासाच्या मुद्द्यावर विरोधक बोलताना दिसत नाहीत, विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून ते कारखान्या विजयी बोलत आहे.या मतदारसंघात विरोधकांनी कोणती विकासाची कामे केली ते सांगावे.

पराभव समोर दिसू लागल्याने विरोधक दामाजीच्या सभासदांवर बोलत आहेत अफवा पसरवत आहेत.पण  दामाजीच्या एकाही सभासदाचे सदस्यत्व रद्द होणार नसल्याचे समाधान आवताडे यांनी स्पष्ट केले.कारखानाचा मोबदला सर्व सभासद घेत आहेत मग सभासत्व रद्द कसे होईल असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला आहे.

विठ्ठल कारखान्यावर 600 कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे.ऊस मागणाऱ्या शेतकऱ्यांना तुरुंगात टाकण्याचे पाप त्यांनी केले आहे.

बारामती उपसा सिंचन योजनेला तुम्ही निधी देताय मग 35 गावाला का निधी दिला नाही. विरोधकांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले पण या काळात कोणती विकास कामे केली आहेत ते सांगावे असा प्रश्न विचारला आहे.

आ.प्रशांत परिचारक म्हणाले की, आजपर्यंत विरोधकांनी येथील जनतेला खोटी आश्वासने देऊन निवडून आले होते. अनेक अपप्रचार करून मते मिळवली.

मी आणि समाधान आवताडे आम्ही दोघांनी केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ही निवडणूक राज्याची दशा आणि दिशा बदलणारी निवडणूक आहे.

35 गावाच्या पाणी प्रश्नावर प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी आश्वासने दिली आहेत, पण कालच्या आर्थिक तरतूदमध्ये यासाठी निधी का उपलब्ध केला  नाही.समाधान आवताडे निवडणूक जिंकणे हेच स्व.सुधाकरपंत परिचारक यांना श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: 35 गाव पाणी प्रश्नदेवेंद्र फडणवीसपंतप्रधान नरेंद्र मोदीमंगळवेढा

संबंधित बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्यात राजकीय हालचालींना वेग! नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ३७ अर्ज दाखल; नगराध्यक्षपदावरून गुप्त बैठका सुरू

November 16, 2025
विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

November 16, 2025
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना स्कॉर्पिओ वाहनात सापडल्या तलवारी; तीन आरोपींना अटक; घातपात करण्याचा डाव उधळून लावला?

November 16, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेसाठी अर्ज दाखलचे प्रमाण वाढले, आज कोना-कोणाचे किती अर्ज आले.. जाणून घ्या..; मतदारांमध्ये संभ्रम अवस्था

November 15, 2025
माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवेढ्यात रंगली मॅरेथॉन स्पर्धा; धुमाळ, कोळेकर ठरले विजेते

माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवेढ्यात रंगली मॅरेथॉन स्पर्धा; धुमाळ, कोळेकर ठरले विजेते

November 15, 2025
सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक; गावातील लोक झाले सक्रिय

उमेदवारांसाठी सर्वात मोठी बातमी! ऑनलाईन सर्व्हरच्या भीतीने अर्ज आता ‘ऑफलाईन’ ही स्वीकारणार; रविवारी सुट्टीच्या दिवशीही संधी

November 15, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

November 14, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अखेर ठरलं! नगराध्यक्ष पदासाठी तिहेरी लढत होण्याची चिन्हे; ‘या’ तिघींमध्ये पेटणार सामना? मंगळवेढ्यातील राजकारण फिरणार; नगरसेवक उमेदवारांची जुळवाजुळव सुरू

November 14, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

लागा तयारीला! जिल्हा परिषद निवडणुकीची लवकरच होणार घोषणा; ‘या’ दिवशी वाजणार बिगुल? राजकीय चर्चांना उधाण

November 14, 2025
Next Post
विद्यार्थ्यांनो! दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

विद्यार्थ्यांनो! दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

ताज्या बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्यात राजकीय हालचालींना वेग! नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ३७ अर्ज दाखल; नगराध्यक्षपदावरून गुप्त बैठका सुरू

November 16, 2025
विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

November 16, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! हॉटेल मालकाने मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाइपने मारहाण केल्याने गुन्हा; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

November 16, 2025
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना स्कॉर्पिओ वाहनात सापडल्या तलवारी; तीन आरोपींना अटक; घातपात करण्याचा डाव उधळून लावला?

November 16, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेसाठी अर्ज दाखलचे प्रमाण वाढले, आज कोना-कोणाचे किती अर्ज आले.. जाणून घ्या..; मतदारांमध्ये संभ्रम अवस्था

November 15, 2025
माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवेढ्यात रंगली मॅरेथॉन स्पर्धा; धुमाळ, कोळेकर ठरले विजेते

माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवेढ्यात रंगली मॅरेथॉन स्पर्धा; धुमाळ, कोळेकर ठरले विजेते

November 15, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..