समाधान फुगारे । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच असून आज आणखी 58 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या 738 वर गेली आहे.
आज बुधवार दि.9 सप्टेंबर रोजी नागरिकांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत. तसेच आज 784 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 784 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह – 58 आणि निगेटिव्ह – 726 जणांचे अहवाल आलेले आहेत. सदरचे नागरिक हे मंगळवेढा शहर 22 , बोराळे 12 , रहाटेवाडी 3 , नंदेश्वर 15 , बालाजीनगर 3 , पाटखळ 1 , भालेवाडी 1 आणि सलगर बु. – 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 738 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 351 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आता पर्यंत 371 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज