टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत आयकर भरणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांकडून आतापर्यंत 5450 शेतकऱ्यांकडून 5 कोटी 36 लाख 34 हजार इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
उद्दिष्टाच्या केवळ 40.72 टक्केच वसुली झाली आहे. 7 कोटींच्या वसुलीसाठी प्रशासनाकडून बॅंकेला थेट कळविण्यात आले आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
या योजनेच्या पोर्टलवर 1 मार्च अखेर 6 लाख 26 हजार 998 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली असून, त्यामध्ये 13 हजार 557 आयकर भरणाऱ्या पात्र लाभार्थींनी 13 कोटी 16 लाख 98 हजार रुपये इतका लाभ मिळवल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
त्यामध्ये 8107 शेतकऱ्यांकडून अद्यापही 7 कोटी 80 लाख 64 हजार रुपये इतकी वसुली बाकी आहे. त्यासाठी प्रशासनाकडून बॅंकांना पत्रव्यवहार करण्यात आला असून, या लाभ घेतलेल्या अपात्र लाभार्थींच्या खात्यातून ते पैसे शासनाला परत पाठवण्यात यावेत.
अन्यथा त्यांचे अकाउंट फ्रीज करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्यामुळे अपात्र लाभार्थींचे बॅंक खाते फ्रीझ होण्यामुळे खळबळ उडाली आहे.1 मार्चपर्यंत सर्वांत जास्त येणे बाकी सांगोला तालुक्यात असून सर्वांत कमी येणे बाकी उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आहे.(सकाळ)
शेतकरी, वसूल रक्कम व कंसात येणे बाकी रक्कम
मंगळवेढा : 733 : 33 लाख 40 हजार (37 लाख 46 हजार)
पंढरपूर : 1665 : 89 लाख 70 हजार (70 लाख 48 हजार)
सांगोला : 1565 : 12 लाख 36 हजार (1 कोटी 42 लाख 8 हजार)
अक्कलकोट : 1076 : 33 लाख 98 हजार (67,22,000)
बार्शी : 1525 : 38 लाख 68 हजार (1 कोटी 12 लाख 2 हजार)
करमाळा : 1359 : 59 लाख 56 हजार (66 लाख 24 हजार)
माढा : 1284 : 67 लाख 40 हजार (55 लाख 44 हजार)
माळशिरस : 2049, 1 कोटी 4 लाख 56 हजार (98 लाख 96 हजार)
मोहोळ : 1016 : 60 लाख 22 हजार (39 लाख 30 हजार)
उत्तर सोलापूर : 435 : 21 लाख 74 हजार (18 लाख 14 हजार)
दक्षिण सोलापूर : 850 : 4 लाख 74 हजार (73 लाख 30 हजार)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज