mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी धनगर समाजाच्या ‘या’ मागणीमुळे भालके गटात खळबळ!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 15, 2021
in सोलापूर, मंगळवेढा
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच धनगर समाजाने राष्ट्रवादी व भाजपकडे उमेदवारीची मागणी करत, विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.

पोटनिवडणुकी संदर्भात रविवारी, होळकरवाडा येथे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍यातील धनगर समाज बांधवांची बैठक झाली. त्यात पोटनिवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

मतदारसंघात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. या मतदारसंघात आतापर्यंत धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नाही. महाविकास आघाडी किंवा भाजपने धनगर समाजाला उमेदवारी देऊन प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, अन्यथा धनगर समाजाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल, अशा इशारा धनगर आरक्षण कृती समितीचे राज्य सन्वयक प्रा. सुभाष मस्के यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिला.

आमदार भारत भालके यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत कधीही निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

मंगळवेढा-पंढरपूरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत.

तर भाजपकडून संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना उमेदवार दिली जाईल अशी अटकळ आहे.

विधान परिषेदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची भूमिका अजूनही गुलदस्तात आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत परिचारक गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. परिचारक गट सध्या तरी पोटनिवडणूक लढवण्याच्या मन:स्थितीत नसल्याची चर्चा आहे.

दरम्यान या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मतदार संघातील धनगर समाज उमेदवारीसाठी आक्रमक झाला आहे. मंगळवेढा तालुक्‍यात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे.

मागील तिन्ही विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाने आमदार भारत भालके यांना मदत केली होती. त्यामुळे आमदार भालके यांचा विजय सोपा झाला होता. त्यांच्या निधनानंतर धनगर समाजाने उमेदवारीची मागणी करत निवडणुकीत बंड करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भालके गटात खळबळ उडाली आहे.

या बैठकीत प्रा.सुभास मस्के, संजय माने, माऊली हळणवर आदींच्या नावावर चर्चा झाली. उमेदवारी संदर्भात लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही प्रा. मस्के यांनी सांगितले. बैठकीला धनगर समाजाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.(सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धनगर समाजपोटनिवडणुकमंगळवेढा पंढरपूर मतदारसंघ

संबंधित बातम्या

चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

May 31, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
Next Post
मंगळवेढयातील जप्त १६१.८८ ब्रास वाळू साठ्याचा जाहीर लिलाव

मंगळवेढा येथे 'या' जप्त वाळू साठ्याचा लिलाव, तारीख वेळ जाणून घ्या

ताज्या बातम्या

चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..