mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्याचे सुपुत्र जिल्हाधिकारी श्रीकांत खांडेकर यांचा साखरपुडा ‘या’ माजी मंत्र्यांच्या कन्येशी झाला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 16, 2021
in मंगळवेढा, राज्य

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील बावची येथील सुपुत्र व सध्या बिहार राज्यात जिल्हाधिकारी म्हणून रुजू असलेले श्रीकांत खांडेकर यांचा विवाह माजी मंत्री राम शिंदे यांच्या मुलीशी जमला आहे

राम शिंदे यांची ज्येष्ठ कन्या डॉ.अक्षता व श्रीकांत यांचा नुकताच चौंडीत येथे ‘साखरपुडा’ झाला आहे.खांडेकर कुटुंब त्यांचे व्याही झालेय. माजी मंत्री राम शिंदे आणि आशाताई शिंदे यांच्या कुटुंबातील हे पहिलेच कार्य. त्यामुळे या दिमाखदार सोहळ्याला अनेकांनी हजेरी लावली. माजी मंत्री राम शिंदे आणि त्यांची पत्नी आशाताई हे मधली काही वर्षे सोडली तर ते कायम चौंडीत वास्तव्यास होते.

काय सांगताय! शिवजयंतीच्या निमित्ताने अमर इलेक्ट्रॉनिक्सची भन्नाट ऑफर! फक्त 19 रु.मध्ये खरेदीकरा कुलर, AC, फ्रीज, टीव्ही व मोबाईल आणि मिळवा 1900 रु किंवा 19 टक्केचा डिस्काउंट

आपसूकच त्यांच्या दोन्ही मुलींनी चौंडीच्या जिल्हा परिषद शाळेतूनच आपल्या शिक्षणाचा ‘श्री गणेशा’ केला. पुढे माध्यमिक शिक्षण जामखेडला तर उच्च शिक्षण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात केले.

राम शिंदे राजकारणात सक्रीय होते. त्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे त्यांना फार लक्ष देता यायचे नाही. पत्नी आशाताई यांनीच मुलांच्या शिक्षणाकडे बारकाईने लक्ष दिले.

आशाताईंनी पतीवर मंत्रिपदाची जबाबदारी आल्यावर पुणं सोडलं नाही. त्याच कारणच मुळी मुलींचे शिक्षण होतं. त्यामुळेच थोरली मुलगी अक्षता एम.बी.एस. झाली.

तर दुसरी अन्विता एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षाला आहे. आमदारकीचा मान मिळाल्यानंतर त्यांना अजिंक्य नावाचे पूत्ररत्न झाले. त्याच्या शिक्षणाचा ‘श्री गणेशा’ मात्र विद्येच्या माहेरघरी झाला. तो आता पाचवी इयत्तेत शिक्षण घेतो आहे.

अहिल्याबाई होळकर यांच्या माहेरकडील घराण्यातील राम शिंदे हे वारसदार आहेत. परंतु माजी मंत्री राम शिंदे यांच्या वडिलांनी दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम केलं होतं. त्यामुळे अर्थातच शिंदे हे संघर्षातूनच राजकारणात पुढे आले.

गावच्या राजकारणापासून त्यांची सुरूवात झाली. सरपंचापासून कॅबिनेट मंत्री आणि आता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असा त्यांचा राज्याच्या राजकारणातील प्रवास राहिला आहे. वडील मंत्री होते तरीही दोन्ही मुलींना मात्र तो बडेजाव मिरवला नाही. दोन्ही मुली शांत आणि अभ्यासू असल्यामुळेच एम.बी.बी.एस. झाल्या!

श्रीकांत खांडेकर…..

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गरिबीशी झगडत श्रीकांत खांडेकर यांनी बीटेकचे शिक्षण दापोली येथून पूर्ण केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून आय.ए.एस.होण्याच स्वप्न उराशी बाळगलं.

त्यांना या वर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले. ते आय.ए.एस. होत जिल्हाधिकारी झाले.
त्यांच्या या प्रेरणादायी यशाचे कौतुक ग्रामस्थांनी नागरी सत्काराने करण्याचे ठरविले. हा सत्कार माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्याचा ठरले.

माजी मंत्री शिदेंनाही श्रीकांत यांनी गरिबीतून मिळविलेल्या यशाचे मोठे अप्रूप वाटले. त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून येणाचे कबूल केले. जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या घरी राम शिंदे गेले.

श्रीकांत यांना अवघी नऊ एकर शेतजमीन आहे. त्यात तीन भावंडे.त्यांच्या आई-वडीलांनी कष्टाने मुलांना शिकवलं. मोठा मुलगा संतोष हा विवाहित असून एका पाईपच्या कंपनीत मार्केटिंग मॅनेजर आहे. धाकट्या महेशची बी.एस्सी. झालीय.

श्रीकांत बी.टेक करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आय.ए.एस. झाले. त्या नागरी सत्कारातच माजी मंत्री राम शिंदे आणि खांडेकर कुटुंबाची ओळख झाली. या कार्यक्रमातूनच सोयरीकीच्या नात्याची ‘वीण’ घट्ट होत गेली.

शिंदे-खांडेकर व्याही झाले. डॉ. अक्षता आणि जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा साखरपुडा झाला. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी हे नाते गुंफले गेले. श्रीकांत हे सध्या म्हसुरी येथे प्रशिक्षण घेत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कन्याजिल्हाधिकारी श्रीकांत खांडेकरमाजी मंत्री राम शिंदेसाखरपुडा

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मनोज जरांगे-पाटलांच्या हस्तेच करा; सकल मराठा समाज आक्रमक

October 26, 2025

खळबळ! अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील भाच्या विरुध्द गुन्हा दाखल

October 26, 2025
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावणार; सत्ता आणण्यासाठी जीवाचं रान करणार; अनिल सावंत यांनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंग..

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावणार; सत्ता आणण्यासाठी जीवाचं रान करणार; अनिल सावंत यांनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंग..

October 25, 2025

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात पिकपच्या धडकेत दुचाकीवरील एकुलत्या एक मुलासह दोघांचा मृत्यू; मृतामध्ये संगणक अभियंत्याचा समावेश

October 25, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक; ‘या’ तारखेला राज्यातील शेतकरी संघटना, अभ्यासकांना बैठकीसाठी घातली साद

October 26, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

तुफान दारू पिऊन नवरा-बायकोचा बेभान राडा, नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलेने पतीचा गळा आवळून केला निर्घृण खून; या खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला

October 25, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

Breaking! महिला डॉक्टर प्रकरण, पोलिसांची पत्रकार परिषद, आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर तर नातेवाईकांनी केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

October 25, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

‘बहिणीच्या नावावरील प्रॉपर्टीला स्टॅम्प ड्युटी नाही, प्रस्ताव विचाराधीन’; मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा

October 26, 2025
Next Post
वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित

महाॲग्री एफपीओ फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षपदी तुळशीदास करांडे

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मनोज जरांगे-पाटलांच्या हस्तेच करा; सकल मराठा समाज आक्रमक

October 26, 2025

खळबळ! अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील भाच्या विरुध्द गुन्हा दाखल

October 26, 2025
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावणार; सत्ता आणण्यासाठी जीवाचं रान करणार; अनिल सावंत यांनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंग..

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावणार; सत्ता आणण्यासाठी जीवाचं रान करणार; अनिल सावंत यांनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंग..

October 25, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

October 25, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात पिकपच्या धडकेत दुचाकीवरील एकुलत्या एक मुलासह दोघांचा मृत्यू; मृतामध्ये संगणक अभियंत्याचा समावेश

October 25, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक; ‘या’ तारखेला राज्यातील शेतकरी संघटना, अभ्यासकांना बैठकीसाठी घातली साद

October 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..