टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील 23 गावच्या सरपंच निवडी आज पार पडल्या.निवडणुकीत एकमेकांच्या हातात हात घातलेले हुलजंतीत निवडीच्या वेळी मात्र परस्परविरोधी उभारले गेले तर नंदेश्नरात एकमेकाच्या विरोधात लढलेले सरपंच पदाच्या निवडणुकीत मात्र एकमेकांच्या गळ्यात गळा पडून गावच्या सत्तेची सूत्रे हातात घेतली.
आज 23 गावच्या सरपंच पदाची निवडणूक अध्यासी अधिकारीकडून 23 गावातील सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
नंदेश्वर येथे एकमेकाच्या विरोधात लढलेले गरंडे व ढोलतडे सरपंच व उपसरपंच पद वाटणी करून एकत्र आले. हुलजंती येथे एकाच पॅनलचे उमेदवार एकमेकाच्या विरोधात सरपंच पदासाठी मीनाक्षी कुरमत्ते यांना आव्हान दिले तर उपसरपंच बाळासाहेब माळी बिनविरोध झाले.
मरवडे येथे नामदेव गायकवाड, लतिफ तांबोळी, दत्तात्रय गणपाटील, संदीप सूर्यवंशी, श्रीकांत गणपाटील यांनी स्थापन केलेल्या गाव विकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले.
महमदाबाद शेटफळ येथे समविचारी तरुणांनी गाव गाडा ताब्यात घेतला. भोसे येथे अवताडे गटाचे उपसभापती सुरेश ढोणे यांच्या पत्नीला सरपंचपद मिळाले तर उपसरपंचपद भालके गटाला मिळाले.
कचरेवाडी येथे अवताडे गटाला सत्ता मिळूनही सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक झाले. गणेशवाडी येथे राखीव जागेचा उमेदवार नसल्यामुळे ते पद रिक्त राहिले. उपसरपंच म्हणून दिपाली तानगावडे यांची निवड झाली.
बोराळे येथे स्थानिक एकत्र येत केलेल्या आघाडीला सत्ता मिळाली सरपंच व उपसरपंच पद दोन्हीही बिनविरोध झाले तर डोणज येथे समसमान सदस्य विजयी झाले.
बिनविरोध सदस्यांने अवताडे गटात कौल दिल्यामुळे अवताडे गटाला सरपंच पद मिळाले तर बिनरोध सदस्य सिद्धाराम कोळी याला उपसरपंच पद मिळाले.
कर्जाळ कात्राळ येथे दामाजी संचालक विजय माने यांच्या पत्नी सरपंच पदी विराजमान झाल्या. बिनविरोध निवडणूक झालेल्या मुढवी येथे महावीर ठेंगील हे सरपंच व मंदाकिनी रोकडे बिनरोध निवडले.
सिद्धापूर येथे परिचारक गटाने भालके गटांच्या मदतीने सत्ता मिळवली मल्लेवाडी येथे अवताडे भालके समर्थकांनी सत्ता मिळवली दुपारी दोन वाजता निवडी जाहीर झाल्यानंतर विजयी सरपंच उपसरपंच त्याच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाके आतिषबाजी करून सत्कार केले.
काही गावच्या सरपंच व त्यांच्या उपसरपंच यांची संपर्क साधून गटाविषयी विचारणा केली असता तालुक्यातील सर्वच नेत्यावर हात ठेवत आम्ही सगळ्यांच असल्याचा दावा करत गाव विकास आघाडीचा दावा केला आहे.
मात्र यापुढील काळात होणाऱ्या सहकारी संस्था व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हा दावा फोल ठरेल याची शक्यता नाकारता येत नाही त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.(sakal)
सरपंच व उपसरपंच नावे पुढीलप्रमाणे :-
नंदेश्वर : सजाबाई गरंडे,आनंदा पाटील ,
मरवडे : सचिन घुले, मीनाक्षी सूर्यवंशी
बालाजीनगर : अंजना राठोड अश्विनी राठोड,
लवंगी : अलका देवकर, सदाशिव लेंगरे,
डोणज : किर्ती केदार, सदाशिव कोळी,
बोराळे : सुजाता पाटील, संतोष गणेशकर
लेंडवेचिंचाळे : नंदा इंगोले,द्वारकाबाई लोखंडे ,
सलगर बुद्रुक : शशिकला टिक्के, श्रीमंत सवाईसर्जे,
माचणूर : पल्लवी डोके, उमेश डोके,
तामदर्डी : रेखा शिंदे, बळीराम शिनगारे,
घरनिकी : सुनिता रणदिवे, बापू भुसे ,
भोसे : सुनिता ढोणे, श्यामल काकडे,
कचरेवाडी : संगीता काळुंगे,संपदा इंगोले,
तांडोर : कविता मळगे,रोशन शेख,
कर्जाळ/कात्राळ : वैष्णवी माने, सुनंदा बंडगर,
मुढवी : महावीर ठेंगील, मंदाकिनी रोकडे ,
सिध्दापूर : लक्ष्मीबाई नांगरे, भिमराया सिंदखेड,
महमदाबाद शे: -सरीता सुडके, संतोष सोनवणे,
आसबेवाडी : स्वाती आसबे, शोभा खताळ,
अरळी : मल्लिकार्जुन भांजे, हेमंत तोरणे
मल्लेवाडीः दिपाली गोडसे, अजित माळी
गणेशवाडी : दीपाली तानगावडे,
हुलजंती : मीनाक्षी करमुत्ते, बाळासाहेब माळी
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज