टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील कै.कमलाकर उर्फ यादव राजाराम पाटील (आण्णा) यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने आज दि.६ फेब्रुवारी व दि.७ फेब्रुवारी रोजी श्राद्ध विधी व इतर कार्यक्रम आयोजित केल्या असल्याची माहिती डी.वाय.पाटील सर यांनी दिली आहे.
आज दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत भरणी श्राध्द होणार असून त्याचबरोबर दुपारी ४ ते ६ या वेळेत श्रीराम महिला भजनी मंडळ एखतपुर यांचे भजन होणार आहे.
सायंकाळी ६ ते ८ वेळेत अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प सुधाकर महाराज इंगळे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते ७ वेळेत श्री.सिद्धनाथ महाभिषेक पूजा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सकाळी ७ ते ८ पर्यंत श्री.सिद्धनाथ मंदिराच्या मागील बाजूस कै.अण्णांच्या स्मृतीस्थानाची व चरण पादुकांची स्थापना व पूजा आयोजित केली आहे.
दुपारी ४ ते ७ या वेळेत जवाहरलाल हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिद्राम बापू यादव व अँड.वसंतराव करंदीकर यांच्या हस्ते तर मनोहर हजारे,अँड.रमेश जोशी व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत स्मरणिका प्रकाशन सोहळा होणार आहे.
रात्री ८ ते १० या वेळेत स्थानिक व इतर भजन सेवा पाटखळ येथे आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन विलास पाटील व विठ्ठल पाटील सर यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज