टीम मंगळवेढा टाईम्स । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत स्थगिती दिल्याने राज्य सरकारने याबाबतचा त्वरीत आदेश काढावा अन्यथा त्याचा समाजात उद्रेक होईल असा इशारा सकल मराठा समाजाचे नेते अॅड.धनंजय हजारे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे.
अॅड.हजारे म्हणाले, न्यायालयाने दिलेला निकाल हे एका कोर्टाचे मत असू शकते ते दिलेल्या वकिलांचे अपयश असू शकत नाही. प्रत्येक वकिल हे प्रयत्न करतात. परंतू ते कोर्टाचे निकाल बदलू शकत नाहीत.
त्यामुळे आता सदर प्रकरण हे एका पेक्षा जास्त न्यायाधीश असलेल्या न्यायालयाकडे वर्ग करण्यात आल्याने बहुमताने पुढील निकाल लागू शकतो. तोपर्यंत राज्य सरकारने अध्यादेश काढणे गरजचे आहे.
सोलापुरात उद्या सकल मराठा समाजाची बैठक
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या निषेधार्थ सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा यांच्यावतीने रविवार दि.१३ रोजी सकाळी ११.०० वा. छत्रपती शिवाजी प्रशाला सोलापूर येथे बैठक आयोजीत केली आहे.
या बैठकीस विविध तालुक्यांचे व शहरातील प्रतिनिधींनी तसेच समाजबांधव व महिला भगिनी यांनी पुढील आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अॅड.धनंजय हजारे यांनी केले आहे.
The state government should issue an ordinance regarding Maratha reservation, otherwise there will be an outbreak: Adv. Dhananjay Hazare
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज