mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अँड.पवार यांचा उड्डाणपुलासाठी पाठपुरावा! सुशीलकुमार शिंदे, जयसिद्धेश्‍वर महाराजांचे गडकरींना पत्र

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 15, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
अँड.पवार यांचा उड्डाणपुलासाठी पाठपुरावा! सुशीलकुमार शिंदे, जयसिद्धेश्‍वर महाराजांचे गडकरींना पत्र

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावर तालुक्‍यात दोन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात यावा, या मागणीसाठी आजी-माजी खासदारांनी लक्ष घातले.

याबाबत त्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे मागणीदेखील केली आहे, त्यामुळे या मागणीची दखल वाहतूक मंत्री घेणार का? असा सवाल तालुक्‍यातील नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

दामाजी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अँड.नंदकुमार पवार यांनी शेतकऱ्यांसाठी लावून धरला आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खा.जयसिद्धेश्‍वर महाराजांनी गडकरींना यांना पत्र लिहले आहे.

माचणूर येथील मुख्य चौकात उड्डाणपूल न करता मुख्य चौकापासून काही अंतरावर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने ते काम करण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडे मुख्य चौकात उड्डाणपूल करावा.

जेणेकरून रहाटेवाडी, तामदर्डी, बोराळे व माचणूर येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी दक्षिण भागात असल्याने सोयीच्या दृष्टीने मुख्य चौकात उड्डाणपूल करावा, या मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दोन महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन संबंधित ठेकेदाराला त्या ठिकाणचे काम थांबण्याच्या सूचना दिल्या.

त्याबाबतची मागणी पत्राद्वारे वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. त्यानंतर गेल्या चार दिवसांपूर्वी बोराळे, अरळी, सिद्धापूर, मुंढेवाडी या गावासह मंगळवेढ्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमीन पूर्व भागात असून उड्डाणपूल नसल्यामुळे त्यांना चार किलोमीटर अंतर जास्तीचे कापावे लागणार आहे.

त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल करावा, यासाठीच्या मागणीचे निवेदन माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आले.

शिंदे यांनीही या प्रश्नी लक्ष घातले असून त्यांनी बोराळेकडे जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपूल करावा, या मागणीचे निवेदन वाहतूक मंत्री गडकरी यांना दिले.

दोन वेगवेगळ्या ठिकाणी उड्डाणपूल करावे, या मागणीचे पत्र सोलापूरच्या आजी-माजी खासदारानी केंद्रीय वाहतूक मंत्री यांना दिले आहे.

मंगळवेढा तालुक्‍यातील महामार्गाचे काम सध्या पूर्णत्वाकडे जात असल्याने या मागणीची दखल कधी घेतली जाणार, याची चर्चा मंगळवेढ्यात होत आहे.

दरम्यान, या कामाचे सर्वेक्षण करताना संबंधित सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी उड्डाणपूल करण्याबाबतची गोष्ट का लक्षात आली नाही? असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उड्डाणपूलखासदार जयसिद्धेश्वर महाराजनंदकुमार पवारनितीन गडकरीमंगळवेढासुशीलकुमार शिंदे

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
Next Post
सरपंच पदासाठी होतीये रस्सीखेच! ‘या’ प्रवर्गातील जागा अधिकाधिक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न

मंगळवेढा ब्रेकिंग! 22 ग्रामपंचायतीच्या 186 जागांसाठी मतदानाला सुरुवात; नऊ गावे संवेदनशील

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..