mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

WhatsApp! ‘या’ तारखेपूर्वी तुम्हाला ‘व्हॉट्सअप’ च्या अटी शर्थी मान्य कराव्याच लागणार अन्यथा..

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 11, 2021
in मनोरंजन
नको त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमुळे हैराण झालात? सेटिंगमध्ये करा फक्त हे बदल!

टीम मंगळवेढा टाईम्स ।

‘व्हॉट्सअप’ हे सोशल मीडिया मेसेंजर अॅप ८ फेब्रुवारीपूर्वी तुम्हाला त्यांच्या अटी शर्थी मान्य करण्यास भाग पाडणार आहे. त्याद्वारे तुम्ही करत असलेल्या संभाषणावरही वॉच ठेवला जाणार आहे.

मात्र, आता यावरून वादनिर्माण होण्याची शक्यता आहे. मध्यातच टेलिग्रामने आता व्हॉट्सअपच्या या नव्या धोरणांची खिल्ली उडवत कॉफिन डान्सचा व्हीडिओ शेअर केला आहे.

अनेकजण या नव्या पॉलिसीमुळे व्हॉट्सअप अनइन्स्टॉल करतील, तसेच सुरक्षितरित्या इतर पर्याय स्वीकारतील, असा टेलिग्राम मेसेंजरचा रोख आहे.

तुम्ही जर दैनंदिन गरजांसाठी जास्तीतजास्त ‘व्हॉट्सअप’चा वापर करत असाल तर आता ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.

नव्या वर्षानिमित्त युझर्सना नव्या अटीशर्थींना मान्यता द्यावी लागणार आहे. ८ फेब्रुवारीपर्यंत तसे न केल्यास तुमचे अकाऊंट बंद करावे लागणार आहे. कंपनीच्या अटी व शर्थी मानण्यासाठी सर्व युझर्सना ८ फेब्रुवारी हीच अंतिम मुदत देण्यात आली आहे.

आतापर्यंत व्हॉट्सअप ही सेवा पूर्णपणे दिली जात होती. तसेच व्हॉटसअपवर कुठल्याही जाहिराती दाखवल्या जात नव्हत्या. त्यामुळे कंपनीचे उत्पन्नाचे साधन काय आहे याबद्दल अत्यंत गोपनीयता बाळगली जात होती.

जगभरात व्हॉट्सअॅपचे एकूण दोनशे कोटी युझर्स आहेत. या सर्वांतर्फे नव्या अटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. या नव्या पॉलीसी आणि अटी काय आहेत याबद्दल जाणून घेऊयात सविस्तर.

काय आहे व्हॉट्सअॅपची नवी पॉलीसी ?

व्हॉट्सअॅपवर नव्याने अटी शर्थी व गोपनियता अटी लागू केल्या आहेत. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की २०२१, ८ फेब्रुवारीपासून ही लागू केली जाणार आहे. त्यानंतर युझर्सला ही पॉलीसी स्वीकारावी लागणार आहे. तसे न केल्यास तुमचे अकाऊंट तुम्हाला वापरता येणार नाही.

त्यासाठी हेल्प सेंटर या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तिथे गेल्यावर पॉलीसीमध्ये सहमत (Agree) किंवा आता नाही असे दोन पर्याय दिसतील. त्यात म्हटले आहे की आम्ही सेवा ऑपरेट करण्यासाठी व्हॉट्सअपवर येणारा जो कंटेट आहे.

जे मेसेज, फोटो, ऑडिओ, व्हीडिओ युझर पाठवत असतो किंवा मिळवत असतो त्याचा वापर कंपनी आता कुठेही करू शकते. तसेच त्याच आशयाचा पूर्नवापर, वितरण आणि दाखवला जाऊ शकतो.

असा निर्णय का घेण्यात आला ?

या पॉलीसी अंतर्गत संमती दिल्यानंतर व्हॉट्सअप आपल्या दोनशे कोटी युझर्सचा डाटा वापरू शकते. तसेच हा डेटा एका प्लॅटफॉर्मवरून दुसरीकडे पाठवू शकते. नव्या पॉलीसीमध्ये स्पष्ट म्हटले आहे की व्हॉट्सअपने नव्या पॉलीसी आणि नोटीफिकेशनद्वारे स्पष्ट केले आहे की, व्हॉट्सअप आता त्यांची पॅरेंट कंपनी इन्स्टाग्राम आणि फेसबूकसोबत डेटा शेअर करून व्यावसाय करू शकतात.

३. पॉलीसीचा युझरवर काय परिणाम होणार ?

जर युझरला व्हॉट्सअप सुरू ठेवायचे आहे तर सर्व अटीशर्थींना मंजूरी द्यावी लागणार आहे. म्हणजे जरी संमती नसली तरीही युझर्सकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे युझर्सची प्रायव्हसी कंपनीसोबत शेअर करावी लागणार आहे. व्हॉट्सअप आता युझर्स संपूर्ण डेटावर नजर ठेवण्यात येणार आहे.

४. अशी ठरणार रणनिती

व्हॉट्सअप आता तुमच्या बँकेचे नाव, त्यातील रक्कम, ऑनलाईन वस्तू मागवल्यावर डिलिव्हरीचे स्थान सगळे ट्रॅक करेल. तुमच्या पैशांच्या व्यवहारांवरही नजर ठेवली जाईल. त्याद्वारे कंपनी युझरचे प्रोफाईलिंग करेल की आपण सर्वसामान्य व्यक्ती आहात की उच्च भ्रू व्यक्ती. तुम्ही कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाता तुम्ही कुठल्या नव्या वस्तू विकत घेता याची चर्चा केलेले तुमचे संभाषण कंपनीकडे असणार आहे.

५. लोकेशन आणि आयपी अॅड्रेस होणार ट्रेस

व्हॉट्सअपने पर्याय दिला आहे की लोकेशनची सेटींग डिसेबल केली जाऊ शकते. त्यात हे देखील स्पष्ट केले आहे की, मोबाईलद्वारे आपले आपल्या आयपी अॅड्रेसद्वारे तुम्ही कुठे आहात याची माहिती मिळवली जाईल.

६. स्टेटसही सुरक्षित नाहीत

व्हॉट्सअप आता आपले स्टेटसही पाहू शकतो. जर तुम्ही स्टेटमध्ये ‘आस्क मी’ या ट्रेंड प्रमाणे विचारले की मी कुठली गाडी खरेदी करू ? त्यात फेसबूक इन्स्टाग्रामवर याची माहिती पाठवली जाईल. त्यानुसार तुम्हाला केवळ गाडीच्या जाहिराती दाखवल्या जातील. तुम्ही जर कुठे फिरण्यासाठी जात असाल तर हॉटेल्स, टूर कंपनी आणि पॅकेज आदी जाहिराती दाखवल्या जातील.

७. आशयाचे निरिक्षण केले जाईल

व्हॉट्सअप आपल्या मित्रांना ग्रुप कंटेट आदी माहिती सुचवू शकतो. त्यामुळे आता प्रत्येक हालचालीवर व्हॉट्सअप नजर ठेवून असणार आहे. त्याचे निरिक्षण केले जाईल. त्यातून मार्केटींग रणनितीसाठी हा डेटा वापरला जाईल.

८. कॉलवरही असणार नजर

युझर कुणाशी किती वेळ व्हॉट्सअपवर बोलतो. कुठल्या ग्रुपवर जास्तीत जास्त सक्रीय असतो. ब्रॉडकास्टच्या किती याद्या आहेत. व्हीडिओ, फोटो फॉरवर्ड केल्यानंतर आता सर्व्हरवर सेव्ह राहणार आहेत. त्यामुळे कुठला व्हीडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड होत आहे याची माहिती कंपनीला मिळणार आहे. याचा फायदा फेक न्यूज ट्रॅक करण्यासाठी होणार आहे. या सर्व अटींमधून बिझनेस अकाऊंट सुद्धा यातून सुटणार नाहीत.

९. आता काय कराल ?

नव्या पॉलीसीचा युझरवर महत्वाचा परिणाम होणार आहे. युझरच्या प्रायव्हवर मोठा परिणाम होणार आहे. कंपनीच्या अटी शर्थींवर संमती दर्शवल्यानंतर या सर्व माहिती पुरवण्यासाठी संमती दिली जाते. व्हॉट्सअॅप सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला आता कंपनीच्या अटी मानन्याशिवाय पर्याय राहत नाही. कारण ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत या शर्थी मान्य केल्या नाहीत तर अकाउंट डिलीट करावे लागणार आहे.

१०. कंपनीच्या एण्ड टू एण्ड एन्क्रिप्टेड पॉलिसीचे काय ?

एण्ड टू एण्ड एन्क्रिप्टेड पॉलिसीमध्ये कंपनी हा दावा करते की मेसेज, डेटा हा कंपनीकडे राहत नाही. ८ फेब्रुवारी रोजी ही कंपनी आता पॉलीसी बंद करणार आहे. ही पॉलीसी तयार करताना कंपनीने म्हटले होते की, तुमची प्रायव्हसी आमच्यासाठी महत्वाची आहे. त्यासाठी आम्ही हे फिचर तयार केले आहे. या अंतर्गत युझर्सचा सर्व डेटा मेसेज, डॉक्युमेंट, सुरक्षित राहतात. त्याचा कॉन्टेंट सुरक्षित राहील. मात्र, नव्या पॉलीसीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नियमव्हाट्सअप्प

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

मंगळवेढ्यात आज घुमणार देशभक्तीचा सूर! ‘सुरसंगम’ व ‘माजी सैनिक संघटने’तर्फे ‘मेरे देशप्रेमियों…’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन

August 15, 2026
Next Post
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिध्दापूर मातुर्लिंग श्री गणपती कमिटीचा यात्रेसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिध्दापूर मातुर्लिंग श्री गणपती कमिटीचा यात्रेसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा