टीम मंगळवेढा टाईम्स ।
माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी सरकोली येथे येणार आहेत. त्यांचा अधिकृत दौरा आला आहे.
आज दि.24 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता फडणवीस हे विमानाणे पुणे येथे येणार आहेत, तिथून मोटारीने पंढरपूर मार्गे सरकोली येथे येणार आहेत.
आज सायंकाळी सव्वा सहा वाजता आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. त्यानंतर ते मोटारीने सोलापूर कडे प्रयाण ठेवणार आहेत.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आ.भारत भालके सतत सरकारला धारेवर धरत होते. मात्र तरीही फडणवीस आणि आ.भालके यांचे व्यक्तिगत संबंध सौहार्दपूर्ण होते.
विधानसभेत फडणवीस यांनी आ.भारत भालके यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कार्याचा गौरव केला होता आणि त्यांचं अकाली जाणे धक्कादायक असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यानंतर वेळ काढून फडणवीस भालके यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी येत आहेत.
तसेच राज्यातील 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचे नेते राज्यभर दौरे करीत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद वाढावी म्हणून सर्वच राजकीय पक्षाचे नेते आपापल्या परीने पर्यत्न करीत आहेत. काल शिवसेनेचे नेते, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी सोलापूर दौरा केला
सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींच्या निवणुका या टप्प्यात होत असून त्यात बहुतांश ग्रामपंचायती मोठ्या आहेत. फडणवीस हे उद्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानेही आढावा घेतली, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
असा असणार दौरा
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या मुलीच्या विवाह समारंभानिमित्त माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर.पंढरपूर येथे जाऊन आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार आहेत.
रात्री ८.४५ वाजता भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या कन्या श्रद्धा यांच्या विवाहनिमित्त आयोजित स्वागत समारंभासाठी ते जुळे सोलापूर येथील मेहता प्रशाला येथे उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी त्यांच्यासोबत माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची उपस्थिती असणार आहे. सोलापूर जिल्ह्यात लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते फडणवीस हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर ते मोटारीने पुण्याकडे रवाना होणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज