mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चांगली बातमी! कोरोनाचे पाहिले लसीकरण ‘या’ देशात; 12 डिसेंबरपासून लस टोचली जाण्याची शक्यता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 23, 2020
in राष्ट्रीय, आरोग्य
चांगली बातमी! कोरोनाचे पाहिले लसीकरण ‘या’ देशात; 12 डिसेंबरपासून लस टोचली जाण्याची शक्यता

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने जगभरात चाहूल दिलेली असताना आता एक चांगली बातमी हाती येत आहे. कोरोनाचा कहर असलेल्या अमेरिकेत येत्या 12 डिसेंरला पहिली लस टोचली जाण्याची शक्यता आहे.

रविवारी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार 11 किंवा 12 डिसेंबरपासून कोरोना (Covid-19) लसीकरण सुरु केले जाईल असे म्हटले आहे.

अमेरिकेची औषध निर्माता कंपनी फायझर आणइ जर्मनीची सहकारी कंपनी बायोएनटेकने कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अमेरिकेच्या एफडीएकडे अर्ज केला होता. यावर एफडीएची 10 डिसेंबरला बैठक होणार आहे.

अमेरिकेचे कोरोना व्हायरस लसीकरणाचे प्रमुख डॉक्टर मोनसेफ स्लाउ यांनी सांगितले की, आमच्या योजनेला मंजुरी मिळाली की 24 तासांच्या आत ही लस लसीकरण करण्याच्या ठिकाणी पोहोच केली जाणार आहे.

यामुळे मंजुरी मिळाल्याच्या एक किंवा दोन दिवस नंतर ही लस टोचली जाईल.फायझर औषध क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. अमेरिकेत मुख्यालय असलेली फायझर बायोएनटेक या जर्मन कंपनीसोबत कोरोनावरील लस तयार करत आहे.

तिसऱ्या टप्प्यात लसीची ९४ कोरोना रुग्णांवर चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ९० टक्के रुग्णांवर लसीचा सकारात्मक परिणाम दिसल्याची माहिती फायझरनं दिली आहे. लसीची चाचणी करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचं किमान एक लक्षण होतं.

फायझरच्या लसीची चाचणी अद्याप संपलेली नाही. मात्र ही लस तिसऱ्या टप्प्यात ९० टक्के यशस्वी ठरल्यानं अपेक्षा उंचावल्या आहेत. बहुतांश रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसल्यानं फायझरची लस लवकरच बाजारात दाखल होऊ शकते.

कोरोनामुळे आतापर्यंत जगात १२ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये आता कोरोनाची दुसरी लाट आल्यानं धोका अधिक वाढला आहे.

कोरोनापासून मुक्तीसाठी संपूर्ण जगाच्या नजरा वैज्ञानिकांकडे लागल्या आहेत. यासंदर्भात बोलताना, अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाने (FDA) म्हटले आहे, की त्यांची व्हॅक्सीन कमिटी आणीबाणीजन्य परिस्थितीतील वापराच्या मंजूरीसाठी मागण्यात आलेल्या परवानगीवर विचार करण्यासाठी 10 डिसेंबरला भेट घेईल.

संघटनेचे प्रमुख स्टेफेन हन म्हणाले, लोकांमध्ये कोरोना लशीप्रति विश्वास निर्माण करण्यासाठी चर्चा आणि पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे, असे एफडीएला वाटते.(source:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना लस

संबंधित बातम्या

काळजी घ्या! मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा चोविसावा बळी; 46 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

दोन महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली; गॅसच्या स्फोटात जखमी झालेल्या मंगळवेढ्यातील ‘त्या’ महिलेचा मृत्यू

August 24, 2025
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

नागरिकांनो! आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मंगळवेढ्यात आज रानभाजी महोत्सवाचे आयोजन; कुठलेही रासायनिक औषधे न वापरलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री

August 21, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातल्या जनतेला मोठं गिफ्ट, मंत्रिमंडळ बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय; राज्यातील ‘या’ विभागाचा चेहरामोहरा बदलणार

August 20, 2025
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! वैद्यकीय पदवी नसताना उपचार; दोन बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल; तालुका आरोग्य विभागाची कारवाई

August 18, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

August 16, 2025
Good News! मंगळवेढा शहरात ‘सिटी स्कॅन’ सेंटर सुरू; अत्यंत माफक दरात मिळणार सेवा

नागरिकांनो! मंगळवेढा शहरात निदान हायटेक ‘सिटी स्कॅन’ सेंटर आजपासून सुरू होणार; स्कॅनचा रिपोर्ट त्वरित व्हाट्सअँपवर मिळणार

August 15, 2025
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

सोनेप्रेमींचे टेन्शन वाढणार! दागिने खरेदी करायचंय? मग आत्ताच करा; भविष्यातील संकेत पाहूनच धडकी भरेल…

August 15, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

बापरे..! संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून…

August 15, 2025
मोठा झटका! राहुल गांधींना कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

पिक्चर अभी बाकी है..! व्होट चोरीवरुन राहुल गांधींचा भाजपला इशारा; गांधींच्या प्लॅनने वाढवलं भाजपचं टेन्शन?

August 13, 2025
Next Post

शेतकऱ्याच्या पदवीधर मुलांना उद्योजक बनवण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले : संग्राम देशमुख

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

आर-पार लढाईची घोषणा! गणपतीच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत धडकण्यावर ठाम; सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करून मुंबईकडे निघा..; मनोज जरांगेंच्या यावेळच्या मागण्या नेमक्या काय?

August 26, 2025
पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 26, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! वनविभागामध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून तरुणाची १३ लाखांची फसवणूक; मंगळवेढ्यातील ‘या’ ठगा विरोधात गुन्हा दाखल

August 26, 2025
मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

August 25, 2025
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

आता सुट्टी नाही! ही शेवटची फाईट, विजयाचा गुलाल लावायचाय, आता मैदान सोडायचं नाही; बीडमधून मनोज जरांगे पाटलाचा फडणवीस सरकारला थेट इशारा

August 24, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा