महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख (वय- 38) यांनी आत्महत्या केली.
गौरी यांचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला होता. गौरी गडाख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे.गौरी यांच्या पार्थिवाचं काल सकाळी औरंगाबादमध्ये पोस्टमार्टम करण्यात आलं. त्यांचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
सोनई येथे काल सायंकाळी गौरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या प्रकरणी तोपखना पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक सौरव अग्रवाल यांनी दिलेली माहिती अशी की, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची सून आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख यांचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला होता.
शनिवारी सायंकाळी 6 च्या सुमारास त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.
या प्रकरणी तोपखना पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गौरी यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
खासगी रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, सायंकाळी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नियमानुसार याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात येऊन पुढील तपास सुरू केला आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
गौरी या ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आणि जल संधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत यांच्या पत्नी होत. तर राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजयी होत्या.
गौरी यांचे माहेर लोणी (ता. राहाता) येथील आहे. त्या थेट राजकारणात सक्रीय नसल्या तरी पती प्रशांत यांनी स्थापन केलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्या कार्यरत होत्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज